White House Press Secretary: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! 27 वर्षीय कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसच्या सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती
लेविट या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या असणार आहे. यापूर्वी हा विक्रम 1969 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात रोनाल्ड झिगलर यांच्या नावावर होता, ज्यांचे वय 29 वर्षे होते.
White House Press Secretary: नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रचाराच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट (Karoline Leavitt) यांची व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवपदी (White House Press Secretary) नियुक्ती केली. 27 वर्षीय लेविट या सध्या ट्रम्पच्या प्रवक्त्या आहेत. लेविट या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या असणार आहे. यापूर्वी हा विक्रम 1969 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात रोनाल्ड झिगलर यांच्या नावावर होता, ज्यांचे वय 29 वर्षे होते. ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून कॅरोलिनचे कौतुक केले आणि आशा व्यक्त केली की, ती पूर्वीप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवेल.
कॅरोलिन यांच्या विषयी बोलताना ट्रम्प म्हणाले की, 'कॅरोलिन लेविटने माझ्या ऐतिहासिक मोहिमेमध्ये राष्ट्रीय प्रेस सेक्रेटरी म्हणून अभूतपूर्व काम केले. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून काम करेल. कॅरोलिन हुशार, कणखर आहे आणि ती अत्यंत प्रभावी संवादक असल्याचे सिद्ध झाले आहे. मला विश्वास आहे की, ती व्यासपीठावर उत्कृष्ट कामगिरी करेल. तसेच आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवताना आमचा संदेश अमेरिकन लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत करेल.' (हेही वाचा -Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिले अन् संसार मोडायची वेळ आली; संताप्त पत्नीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव)
कोण आहे कॅरोलिन लेविट?
लेविट या न्यू हॅम्पशायरची रहिवासी असून त्यांनी रिपब्लिकन एलिस स्टेफॅनिकसाठी कम्युनिकेशन डायरेक्टर बनण्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये सहाय्यक प्रेस सचिव म्हणून काम केले. 2022 मध्ये, त्यांनी न्यू हॅम्पशायरमधील काँग्रेसच्या जागेसाठी निवडणूक लढवली. त्यानंतर स्पर्धात्मक रिपब्लिकन प्राइमरी जिंकली. परंतु, शेवटी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाच्या ख्रिस यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. (हेही वाचा - Donald Trump विजयाच्या उंबरठ्यावर; पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मानले अमेरिकन जनतेचे आभार (Watch Video))
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 4 प्रेस सचिव -
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी सामान्यत: प्रशासनाचा सार्वजनिक चेहरा म्हणून काम करतात आणि ऐतिहासिकदृष्ट्या प्रेस कॉर्प्ससाठी दैनंदिन ब्रीफिंग्ज आयोजित करतात. ट्रम्प यांनी स्वतः त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम करणे पसंत केले. 2017 ते 2021 या काळात ट्रम्प यांच्या अध्यक्षतेदरम्यान चार प्रेस सचिव होते, परंतु त्यांनी अनेकदा त्यांच्या रॅली, सोशल मीडिया पोस्ट आणि स्वतःच्या ब्रीफिंगद्वारे जनतेशी थेट संपर्क साधण्यास प्राधान्य दिले.