Justin Bieber: जस्टीन बीबर झाला बाबा, इन्स्टाग्रामवर शेअर केला बाळाचा फोटो
जगभरातील लोकप्रिय पॉप सिंगर जस्टिन बीबर आणि मॉडेल हेली बीबर अखेर आई वडिल झाले आहेत. त्यांच्या घरात आनंदाचे वातावर झाले आहे. हेलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी जस्टिनने इंस्टाग्रामवर दिली आहे.
Justin Bieber: जगभरातील लोकप्रिय पॉप सिंगर जस्टिन बीबर आणि मॉडेल हेली बीबर अखेर आई वडिल झाले आहेत. त्यांच्या घरात आनंदाचे वातावर झाले आहे. हेलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी जस्टिनने इंस्टाग्रामवर दिली आहे. यासोबतच बाळाची झलकही दाखवण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने एक ह्रदयस्पर्शी पोस्ट देखील लिहली आहे. जस्टीन आणि हेलीच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. (हेही वाचा- राजकुमार हिरानीची OTT वर एंट्री, विक्रांत मॅसी आणि अर्शद वारसीसोबत सायबर क्राईम थ्रिलर 'प्रीतम पेड्रो'ची घोषणा)
मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन यांच्या मुलाचे नाव जॅक ब्लू बीबर आहे. यासंदर्भात त्याने स्वत: इन्स्टाग्रामवर माहिती दिली. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी जस्टीन बीबरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात त्याने बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहले की, वेलकम होम जॅक ब्लूज बीबर. फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी अभिनंदन केले.
जस्टीने शेअर केला बाळाचा फोटो
जस्टीन बीबरने हेलीच्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर चर्चेत राहिला होता. त्याने अनंतर अंबानी आणि राधिका मर्चटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी भारतात आला होता. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये त्यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता, ज्याच्या क्लिप व्हायरल झाल्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.