Israel Gaza War: गाझामधील पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूची संख्या पोहोचली 34,568 वर

शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत इस्रायली सैन्याने ३३ पॅलेस्टिनींना ठार केले तर ५७ जण जखमी झाले, जाणून घ्या अधिक माहिती

Israel-Hamas War (Photo Credit: ANI)

Israel Gaza War: हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 34,568 झाली आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत इस्रायली सैन्याने ३३ पॅलेस्टिनींना ठार केले तर ५७ जण जखमी झाले. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून एकूण मृतांची संख्या 34,568 वर पोहोचली आहे आणि जखमींची संख्या 77,765 आहे. बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, इस्रायलचे सततचे हल्ले आणि बचाव पथकांच्या कमतरतेमुळे काही पीडित लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले. यानंतर इस्रायलने गाझामध्ये हमासवर जोरदार हल्ला चढवला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif