Reverse Aging is Possible? हार्वर्डच्या शास्त्रज्ञांचा दावा- 'म्हातारपण तरुणाईत बदलण्यासाठी शोधले रासायनिक मिश्रण'; उंदीर आणि माकडांवरील प्रयोग यशस्वी
संशोधकांच्या एका चमूने सहा रसायनांचे मिश्रण शोधून काढले आहे, जे मानव आणि उंदरांच्या त्वचेच्या पेशींमध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया अनेक वर्षांनी उलट करू शकते.
काळाबरोबर आपले वयही (Age) वाढत जाते. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. तसेच शरीराचे अवयव कमकुवत होऊ लागतात. अनेक प्रकारचे आजार आपल्या अवतीभवती फिरू लागतात. वयानुसार रोग आणि नंतर मृत्यूचा धोकाही वाढतो. वृद्धत्वाचे परिणाम दूर करता येत नाहीत. मात्र काही उपायांनी ते काही काळ दूर करता येतात. म्हणूनच म्हातारपण ही अशी अवस्था आहे जी कोणालाच नको आहे. सध्या बोटॉक्ससारखे काही तंत्रज्ञान आहेत, ज्यांमुळे वाढत्या वयाच्या खुणा काही प्रमाणात लपवता येऊ शकतात.
आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या (Harvard Researchers) शास्त्रज्ञांनी एक औषध कॉकटेल (Chemical Cocktail) शोधून काढले आहे, जे एका गोळीत मिसळले जाऊ शकते व ज्यामुळे रिव्हर्स एजिंग (Reverse Aging) शक्य आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टने यावर प्रकाश टाकला आहे. 'केमिकली इंड्युस्ड रीप्रोग्रामिंग टू रिव्हर्स सेल्युलर एजिंग' या शीर्षकाचा अभ्यास 12 जुलै रोजी जर्नल एजिंगमध्ये प्रकाशित झाला.
याचा अर्थ असा आहे की, त्यांनी रासायनिक रीप्रोग्रामिंगद्वारे सेल्युलर वृद्धत्व कसे पूर्ववत करायचे याचा अभ्यास केला आहे. संशोधकांच्या एका चमूने सहा रसायनांचे मिश्रण शोधून काढले आहे, जे मानव आणि उंदरांच्या त्वचेच्या पेशींमध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया अनेक वर्षांनी उलट करू शकते. हार्वर्डचे संशोधक डेव्हिड सिन्क्लेअर (David Sinclair) यांनी ट्विटरच्या थ्रेडवर यावर लिहिले की, 'जीन थेरपीचा (Gene Therapy) वापर करून वृद्धत्व कसे बदलणे शक्य आहे हे आम्ही यापूर्वी पाहिले आहे. आता आम्हाला आढळले आहे की, ही प्रक्रिया रासायनिक कॉकटेलसह देखील शक्य आहे, जी संपूर्ण शरीराला पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.’
प्रत्येक रासायनिक मिश्रणामध्ये 5 ते 7 घटक असतात, जे शारीरिक आणि मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी ओळखले जातात. सिंक्लेअर यांनी सांगितले की, त्यांनी आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील त्यांच्या टीमने पेशींचे वृध्दत्व उलट करू शकणारे रेणू शोधण्यासाठी आणि मानवी पेशींचे पुनरुत्पादन करण्यासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. (हेही वाचा: Dengue Symptoms And Treatment: पावसाच्या पाण्यात झपाट्याने वाढतात डेंग्यूचे डास; 'ही' लक्षणे दिसल्यास करा त्वरित तपासणी)
सिंक्लेअरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'या रासायनिक मिश्रणांचे ऑप्टिक नर्व्ह, मेंदूच्या ऊती, मूत्रपिंड आणि स्नायूंवरील अभ्यासाचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. उंदरांवर केलेल्या प्रयोगात त्यांचे आयुर्मान कमी झाल्याचे दिसून आले आणि यावर्षी एप्रिलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगांमध्ये सुधारणा दिसून आली. आता मानवांचे वय उलटे करण्याच्या पहिल्या चाचणीची तयारी सुरू आहे आणि पुढील वर्षाच्या अखेरीस ते सुरू होण्याची शक्यता आहे.’