इराण येथे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे 194 जणांचा मृत्यू
तसेच मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून 194 वर गेला आहे. याबाबत अधिक माहिती एफफी न्यूज ऐजंसी यांनी दिली आहे.
चीन मधील वुहान (Wuhan) शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर कोरोना व्हायरसचे जाळे आता जगभरात पसरले जात असून आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसाचा शिरकाव आता भारतात होत असून विमानतळावर नागरिकांची स्क्रिनिंग पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. तर ताज्या अपडेटनुसार, इराण (Iran) येथे कोरोना व्हायरसचा संक्रामण झाल्याची 49 प्रकरणे समोर आली आहेत. तसेच मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून 194 वर गेला आहे. याबाबत अधिक माहिती एफफी न्यूज ऐजंसी यांनी दिली आहे.
तसेच इराणची राजधानी तेहेरानमध्ये भारतातील 600 भाविक अडकले आहेत. देभरातून 2 हजार भाविक येथे अडकले आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशाने सीमाबंदी केल्याने त्यांना देशाबाहेर जाणे मुश्किल झाले आहे. या भाविकांकडून मायदेशी घेऊन जावे अशी मागणी केली जात आहे. तेहेरानमधील कुम शहरात भारतातील नागरिक अडकले आहेत. हे सर्व भाविक शिंपा पंथियांसाठी पवित्र असलेल्या आणि अन्य धर्मस्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र कोरोना व्हारसचे संक्रामण इराणमध्ये झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी सीमा बंद केल्या.(Coronavirus in India: केरळमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोना विषाणूची लागण; भारतातील एकूण रुग्णांची संख्या 40)
इराण मध्ये अडकलेले कोल्हापूर आणि परिसरातील 34 जण अडकले आहेत. तर या सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावी अशी मागणी सुप्रीया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी केली आहे. इराण मध्ये अडकलेल्यांची नावे आणि पासपोर्टचा तपशील याची माहिती देण्यात आल्याचे ही सुप्रीया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले होते.