International Women's Day 2019: आठ मार्चला सरकारी सुट्टी देऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात हे देश

बुल्गारिया आणि रोमानिया हे देश 8 मार्च हा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा करतात.

women's day celebration | (Photo credit: archived, edited, symbolic images)

International Women's Day 2019: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आज म्हणजेच 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात साजरा केला जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. ती आजतागायत सुरु आहे. जगभरातील अनेक देश हा दिवस साजरा करत असले तरी, खूपच कमी देश आहेत ज्यांनी या दिवशी सरकारी सुट्टी (Government Holidays) जाहीर केली आहे. या देशांच्या यादीत भारताचे स्थान नाही. भारत सरकारने हा दिवस सरकारी सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला नाही. विशेष म्हणजे भारताचा शेजारी असलेला छोटासा देश नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला सरकारी सुट्टी दिली जाते.

भारताचा शेजारी नेपाळ या देशासोबतच Madagascar या देशातही या दिवशी सरकारी सुट्टीदिली जाते. दरम्यान, जगभरातील असे काही देशांमध्ये महिला दिनाला सरकारी सुट्टी दिली जात नाही. मात्र, हा दिवस व्यापक स्वरुपात साजरा केला जातो. महिला दिन व्यापक रुपाने साजरा करणाऱ्या देशांमध्ये अफगानिस्तान, अंगोला, आर्मेनिया, अजरबैजान, बेलारूस, बुर्किना फासो, कंबोडिया, क्यूबा, जॉर्जिया, गिन्नी-बिसाउ, इरीट्रिया, कजाखिस्तान, किर्गिस्तान, लाओस, माल्डोवा, मंगोलिया, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, यूगांडा, यूक्रेन, उज्बेकिस्तान, व्हियेतनाम आणि झाम्बिया या देशांचा समावेश आहे. (हेही वाचा, International Women's Day 2019: महिलांना आहेत हे '8' खास अधिकार!)

दरम्यान, कॅमरून, क्रोएशिया, रोमानिया, मोंटेनेग्रो, बोस्निया, हर्जेगोविना, सर्बिया, बुल्गारिया आणि चिली या देशांमध्येही 8 मार्च हा दिवस एखाद्या सार्वजनिक उत्सवाप्रमाणे साजरा करतात. बुल्गारिया आणि रोमानिया हे देश 8 मार्च हा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा करतात.