भारताचा मोस्ट वाँटेड जाकिर नाइक याला मिळतो आखाती देशांकडून पैसा

तो एक इस्लामिक प्रचारक आणि उपदेशक आहे. तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरपी) आणि पीस टीवीचा संस्थापक आहे. हे टीव्ही चॅनल सौदी अरब येथून उर्दू आणि इंग्रजी भाषेत प्रसारित होणारे टीव्ही चॅनल आहेत.

Zakir Naik | (Photo Credits: YouTube Screengrab)

मोस्ट वाँडेट (Most Wanted) कट्टरतावादी आणि इस्लाम प्रचारक जाकिर नाइक (Zakir Naik) हा सध्या मलेशिया (Malaysia) येथे राहात आहे. सध्या तो भारत विरोधी कारवायांचा प्रचार करतो आहे. त्याला आखाती देशातील श्रीमंतांचा पाठिंबा असून, ते त्याला आर्थिक मदतही करत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. आयएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, नाइक हा त्याच्या जुन्या संपर्कात असलेल्या एका कतर निवासीच्या सानिध्यात होता. तसेच, त्याने रमजान काळात दान देण्यासाठी सूचवले होते.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, कतर येथील कथीत निवासीने जाकिर नाइक याला तब्बल 5 लाख डॉलर इतके अर्थसहाय्य देण्याचे कबूल केले आहे. कतर येथील हा व्यक्ती नाइक याचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. तो नाइक याच्या वतीने अनेक धार्मिक संस्था, संघटना आणि व्यापारी तसे उद्योजकांकडे संघटनेसाठी निधी जमवत असतो.

जाकिर नाइक हा मुळचा मुंबईचा राहणारा आहे. तो एक इस्लामिक प्रचारक आणि उपदेशक आहे. तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरपी) आणि पीस टीवीचा संस्थापक आहे. हे टीव्ही चॅनल सौदी अरब येथून उर्दू आणि इंग्रजी भाषेत प्रसारित होणारे टीव्ही चॅनल आहेत. नाइक हा काही आंदोलनांशीही संबंधित आहे. यात दक्षिण कर्नाटक सलाफी आंदोलन आणि अल-लिसान इस्लामिक फाउंडेशन संबंधीत आंदोलनाचा समावेश आहे. (हेही वाचा, झाकिर नाईक याच्या विरोधात PMLA कोर्टाकडून नव्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी)

भारत सरकार नाइक याच्या शोधात आहे. तसेच, भारत सरकारकडून जाकिर नाइक यांची चौकशी करत आहे. या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने आखाती देश आणि यूएई, कतर आदी देशांमध्ये अनेक बँक खाती उघडली आहेत. अनेक आईआरएफ आणि संघटना आपला पैसा गुंतवण्यासाठी नाइक याच्या बँक खात्यांचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे. भारत सरकारने आईआरएफ वर पाच वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे.