Indian Dies In USA: अमेरिकेत Pennsylvania मध्ये भारतीय तरूणीचा कार अपघातामध्ये मृत्यू
Arshia Joshi चं कार अपघातामध्ये अमेरिकेत निधन झालं आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) च्या भारतीय दूतावासाने आज (24 मार्च) 21 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याने शोक व्यक्त केला आहे. Arshia Joshi असं या मुलीचं नावं आहे. 21 मार्चला अमेरिकेत Pennsylvania मध्ये कार अपघातात तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान Arshia Joshi चं पार्थिव भारतामध्ये पाठवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे स्थानिक नेते आणि समाजाने म्हटलं आहे. भारतीय दूतावास जोशी कुटुंबाशी संपर्कामध्ये असल्याचं देखील म्हटलं आहे.
पूर्वीचं ट्वीटर आणि आताच्या X वर पोस्ट करत Indian Consulate in New York ने आपला शोक व्यक्त केला आहे. 'Arshia Joshi,ही अमेरिकेतील तरूण प्रोफेशनल होती. एका कार अपघातामध्ये तिने 21 मार्च दिवशी Pennsylvania मध्ये जीव गमावला आहे. तिच्या मृत आत्म्यास शांती प्रदान होवो' अशा भावना त्यांनी ट्वीट केल्या आहेत.
पहा ट्वीट
दरम्यान मागील काही दिवसांत अमेरिकेमध्ये भारतीयांवर हल्ले होण्याची संख्या देखील चिंता वाढवणारी आहे. याबद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. 2024 वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात मृत्यू होणार्यांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे.