पुणे येथील योगेंद्र पुराणिक यांचा जपान मधील निवडणुकीत विजय

पुणे (Pune) येथील योगेंद्र पुराणिक (Yogendra Puranik) उर्फ योगी यांनी जपान (Japan) मधील निवडणुकीत विजय मिळवला आहे.

योगेंद्र पुराणिक (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पुणे (Pune) येथील योगेंद्र पुराणिक (Yogendra Puranik) उर्फ योगी यांनी जपान (Japan) मधील निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर प्रथमच एका भारतीय नागरिकाने जपान मधील निवडणुक लढवत इतिहास रचला आहे. या निवडणुकीसाठी 21 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 23 एप्रिल रोजी मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला.

'एदोगावा  म्युनिसिपल कॉर्पोरेशन' या निवडणुकीत योगी यांचा विजय झाला आहे. योगी हे मुळचे पुणेकर असून त्यांनी इडोगाव मतदारसंघातून निवडणुक लढवली. इडोगाव येथे जनसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच योगी यांना तेथे विजय मिळवता आला. योगी यांना मिळालेली मते ही पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक मते ठरली आहेत.(एदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय)

मतदान होण्यापूर्वी योगी यांनी सादर केलेल्या जाहीरनाम्यातूनच त्यांनी जनतेची मने जिंकली. त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला शासकीय शिक्षण मिळावे असे मुद्दे मांडण्यात आले होते. जाहीरनाम्यात मांडलेले मुद्दे हे तेथील नागरिकांचे प्रथम प्राधान्य असल्याचे योगी यांनी म्हटले आहे.

योगी हे सीडीपी (CDP) पक्षासाठी गेली दहा वर्षापासून कार्य करत असून ते माजी बँक कर्मचारीसुद्धा आहेत. तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जपानच्या एका आयटी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून जपानमध्ये योगी स्थायिक आहेत.