लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी 9-15 मे दरम्यान एअर इंडियाची विशेष उड्डाणे; भारतीय दूतावासाने जारी केली Travel Advisory
दरम्यान या सर्व नागरिकांना परत आणण्याची भारत सरकारने प्रकीया सुरु केली आहे. या प्रक्रीयेत एअर इंडियाच्या कर्मिशियल फ्लाईट्स 9-15 मे दरम्यान अमेरिकेतून भारताच्या विविध शहरांत उड्डाण करतील.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परदेशात अनेक ठिकाणी भारतीय अडकून पडले आहेत. दरम्यान या सर्व नागरिकांना परत आणण्याची भारत सरकारने प्रकीया सुरु केली आहे. या प्रक्रीयेत एअर इंडियाच्या कमर्शियल फ्लाईट्स 9-15 मे दरम्यान अमेरिकेतून भारताच्या विविध शहरांत उड्डाण करतील. या फ्लाईट्समध्ये बैठक व्यवस्था मर्यादीत स्वरुपात उपलब्ध असल्याने मेडिकल इर्मजन्सी असलेल्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थी, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्ती प्राधान्यक्रमावर असतील. या प्रवासाच्या तिकीट दर नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे.
प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची मेडिकल स्क्रिनिंग करण्यात आहे. तसंच भारतात परतल्यानंतरही त्यांचे स्क्रिनिंग करण्यात येईल. भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आरोग्य सेतू डाऊनलोड करुन त्यात रजिस्टर करणे अनिवार्य आहे. भारतात परतल्याने प्रत्येक प्रवाशाला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे देखील गरजेचे आहे. 14 दिवसांनंतर प्रत्येक प्रवाशाची कोविड 19 ची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील.
ANI Tweet:
Travel Advisory:
सर्व प्रवाशांना विमानात दाखल होण्यापूर्वी अमेरिकन सरकारने दिलेले सर्व हेल्थ प्रोटोकॉल्स पाळणे बंधनकारक आहे. प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व प्रवाशांकडून एक हमीपत्र स्वाक्षरी करुन घेतले जाईल. तसंच भारतात परतल्यानंतरही आरोग्य मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.