IPL Auction 2025 Live

भारतीय व्यावसायिकामुळे पाकिस्तानी जनतेला मिळणार पाणी, सिंध प्रांतात बसवले हातपंप

या काळातच जोगिंदर सिंह सलारिया यांनी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील परिसरात हातपं बसवले.' या परिसरातील लोकांची दुर्दशा आणि हालाकीची स्थिती पाहूनच त्यांनी हा निर्णय केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून घेतल्याचे सांगितले.

Hand Pumps | (Photo Credits: Wikimedia Commons )

एका भारतीय व्यवसायिकामुळे (Indian Businessman) पाकिस्तानातील दक्षिण-पूर्व सिंध प्रांत परिसरातील अत्यंत गरिब लोकवस्ती असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. जोगिंदर सिंह सलारिया (Joginder Singh Salaria) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. सलारिया यांनी या प्रांतात सुमारे 60 हातपंप (Hand Pumps) बसवले आहेत. भारत-पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमिवर केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी हे हातपंप बसवले आहेत. या प्रांतातिल लोकांच्या पाणीसमस्येबाबत जोगिंदर सलारिया यांना प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी या भागात हातपंप बसविण्याचा निर्णय घेतला.

जोगिंदर सिंह सलारिया हे सिंध प्रांतात केवळ हातपंप बसवूनच थांबले नाहीत. तर त्यांनी येथील लोकांसाठी अन्नधान्य पाठविण्याचीही व्यवस्था केली. त्यासाठी त्यांनी काही ट्रक अन्न पाठवले. प्राप्त माहितीनुसार, जोगिंदर सिंह सलारिया हे 1993 पासून संयुक्त अरब अमीरात येथे राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्ट (परिवहन) चा व्यवसाय आहे. फेसबुक, युट्यूब यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स आणि काही प्रसारमाध्यमांतून त्यांना या परिसरातील लोकांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातूनच त्यांनी लोकांसोबत संपर्क साधला आणि आपले कार्य पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत पोहोचवली. (हेही वाचा, S400 Missile Defense System: रशियाकडून S-400 मिसाइल संरक्षण प्रणाली खरेदीचा भारत-अमेरिका संबंधावर गंभीर परिणाम होईल: US)

जोगिंदर सिंह सलारिया यांच्या हवाल्याने खलीज टाईम्स ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 'पुलवामा घटनेनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला होता. या काळातच जोगिंदर सिंह सलारिया यांनी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील परिसरात हातपं बसवले.' या परिसरातील लोकांची दुर्दशा आणि हालाकीची स्थिती पाहूनच त्यांनी हा निर्णय केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून घेतल्याचे सांगितले.