Explosion In University Gym In Marawi: फिलीपिन्समध्ये मारावी येथील विद्यापीठात स्फोट; 3 जण ठार, तर 9 जण जखमी

शैक्षणिक संस्थांवरील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केलाच पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

Explosion प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Explosion In University Gym In Marawi: फिलिपाइन्समधून (Philippines) एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील विद्यापीठात झालेल्या स्फोटात (Explosion In University) तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नऊ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मारावी शहरातील मिंडानाओ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये (Mindanao State University) रविवारी कॅथोलिक प्रार्थनेदरम्यान स्फोट झाला.

लानाओ डेल सुर प्रांताचे गव्हर्नर मामिंटल अलोन्टो एडिओंग जूनियर यांनी बॉम्बस्फोटाचा निषेध केला. शैक्षणिक संस्थांवरील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केलाच पाहिजे यावर त्यांनी भर दिला. एका निवेदनात त्यांनी सांगितले की, येथे माझ्या प्रांतात, आम्ही मूलभूत मानवी हक्कांचे समर्थन करतो आणि त्यात धर्माचा अधिकार समाविष्ट आहे. शैक्षणिक संस्थांवरील दहशतवादी हल्ल्यांचाही निषेध केला पाहिजे. कारण हीच ठिकाणे शांततेची संस्कृती वाढवणारी आणि आपल्या तरुणांना या देशाचे भावी निर्माते म्हणून घडवणारी ठिकाणे आहेत.' (हेही वाचा - Turkey Explosion Videos: तुर्कस्तानच्या डेरिन्स बंदरात धान्याच्या गोदामात भीषण स्फोट; अनेकजण जखमी, Watch Video)

दरम्यान, मिंडानाओ स्टेट युनिव्हर्सिटीचे म्हणणे आहे की, एका धार्मिक मेळाव्यादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला असून सर्वत्र या भीषण कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा - Shimla Explosion CCTV Footage: भोजनालयात अचानक स्फोट, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video))

एका निवेदनात विद्यापीठाने म्हटले आहे की, 'आम्ही या मूर्खपणाच्या आणि भयंकर कृत्याचा नि:संदिग्धपणे निषेध करतो. तसेच पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. आम्ही या शोकांतिकेमुळे प्रभावित झालेल्यांना समर्थन आणि मदत देण्यास वचनबद्ध आहोत.'



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif