पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर रॉकेट हल्ला; 9 जणांचा मृत्यू

या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील सैन्य प्रत्युत्तरासाठी सज्ज आहे.

(Representational Image/ Photo: Twitter @ahmedjnena2)

पाकिस्तान (Pakistan) ने शुक्रवारी अफगाणिस्तानवर (Afghanistan) रॉकेट हल्ला (Rocket Attack) केला. या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील सैन्य प्रत्युत्तरासाठी सज्ज आहे.

दरम्यान, अफगाण सैन्यांना पाकिस्तानी सैन्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तान लष्करप्रमुख जनरल मोहम्मद यासीन जिया लेवी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व सैन्य दलाला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा - US Presidential Elections 2020: अमेरिकेमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा, मतदान 'सुरक्षित' होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्याचा सल्ला)

या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सध्या या दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढल्याने अफगाणिस्तानने आपल्या लष्कराला आणि हवाई दलाला सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानवर रॉकेट हल्ला सुरूचं ठेवला तर अफगाण सैन्यदलाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचेदेखील अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुले आणि महिला ठार झाल्या आहेत.