Hong Kong Multimillion Dollar Scam: 90 वर्षीय महिलेची तब्बल 2.41 अब्ज रुपयांची फसवणूक; हाँग काँग येथील घटना
सायबर गुन्हेगारांनी एका 90 वर्षीय महिलेची तब्बल 2 अब्ज रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना हाँग काँग (Hong Kong) येथे घडली. या फसवणुकीची (Hong Kong Multimillion Dollar Scam) सध्या जगभर चर्चा सुरु आहे.
सायबर गुन्हेगारांनी एका 90 वर्षीय महिलेची तब्बल 2 अब्ज रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना हाँग काँग (Hong Kong) येथे घडली. या फसवणुकीची (Hong Kong Multimillion Dollar Scam) सध्या जगभर चर्चा सुरु आहे. फसवणुकीतील रक्कम जर ऐकली तर डोळे विस्फारणे सहाजिक आहे. पण धक्कादायक असे की ही फसवणूक ही फोन कॉलच्या माध्यमातून झाली. आपल्यालाही अनेकदा फोनवर असे अनेक कॉल (Phone Call) येतात. ज्यात ऑफर, डिस्काऊंट, लॉकरी (Lottery) लागल्याचे, क्रेडीट कार्ड फ्री ऑफर या निमित्ताने हे कॉल येतात. हाँग काँग मधील महिलेसोबतही अशाच प्रकारे घटना घडली. तिलाही अशाच प्रकारे फसविण्यात आले. या घटनेबाबत हाँग काँग पोलिसांनी (Hong Kong Police) गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हाँग काँग पोलिसांनी म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार श्रीमंत लोकांना फोन करुन संपर्क साधतात आणि त्यांची फसवूक करतात. Hong Kong Multimillion Dollar Scam प्रकरणातही गुन्हेगारांनी महिलेला फोन करुन बँक अकाऊंटमधून पैसे मागितले होते. पीडित वृद्ध महिला ही हाँग काँग मध्ये एका श्रीमंत वस्तीत एकटीच राहते. पाठिमागच्या उन्हाळ्यात गुन्हेगारांनी तिला फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. या महिलेला त्यांनी आपण चीनी तपास अधिकारी आहोत. आपल्या बँक खात्यातील सर्व रक्कम आपण आमच्या तपास टीमच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करा. जेणेकरुन आपली तपासणी होईल आणि आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षीत व्हाल. (हेही वाचा, नॉर्वेच्या पंतप्रधानांना COVID19 चे नियम मोडणे पडले महागात, पोलिसांनी ठोठावला 'इतका' दंड)
विशेष म्हणजे महिलेने फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आपल्या खात्यावर असलेली सर्व रक्कम संबंधीत खात्यावर वर्ग केली. काही दिवसांनंतर एक व्यक्ती (सायबर गुन्हेगार) संबंधित महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला एक फोन आणि सीमकार्ड दिले. या फोनच्या माध्यमातूनच आपण आमच्याशी संपर्क करा असेही या व्यक्तीने सांगितले.
पीडित महिलेच्या खात्यावरुन 11 वेळा व्यवहार झाला. पाच महिन्यांच्या काळात महिलेच्या खात्यावरुन तब्बल 3.2 कोटी डॉलर म्हणजेच 2.41 अब्ज रुपये ट्रान्सफर करण्यात आले. या व्यवहारांबाबत महिलेच्या घरी काम करणाऱ्या नोकराला शंका आली. त्याने महिलेच्या मुलीसोबत संपर्क साधला. त्यानंतर महिलेच्या मुलीने हॉन्ग कॉन्ग पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)