IPL Auction 2025 Live

Halifax Walmart Death: हॅलिफॅक्स वॉलमार्ट बेकरीच्या ओव्हनमध्ये आढळला 19 वर्षीय शीख महिलेचा मृतदेह

कॅनडा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

कॅनडा येथील हॅलिफॅक्स (Halifax Walmart Death), नोवा स्कोटिया येथील वॉलमार्टमध्ये काम करणारी 19 वर्षीय शीख महिला शनिवारी रात्री बेकरी विभागातील दुकानाच्या वॉक-इन ओव्हनमध्ये मृतावस्थेत (Sikh Woman Death) आढळली. हॅलिफॅक्स प्रादेशिक पोलिसांनी (HRP) पुष्टी केली की, शनिवारी रात्री त्यांना 9.30 च्या सुमारास त्यांना वॉलमार्टला 6990 ममफोर्ड रोड येथे अचानक मृत्यूची घटना घडल्याने मदतीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांनी (Canada Police) सांगितले की, तरुणीचा मृतदेह दुकानाच्या बेकरी विभागाच्या वॉक-इन ओव्हनमध्ये सापडला. या घटनेनंतर वॉलमार्टचे ठिकाण त्वरित बंद करण्यात आले. ही महिला महिला दुकानात काम करत असल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, अद्याप तिची ओळख पटू शकली नाही.

शीख समाज हादरला

मेरीटाईम शीख सोसायटीने पुष्टी केली की, ती महिला त्यांच्या समुदायाची सदस्य होती. स्थानिक माध्यमांशी बोलताना सोसायटीचे अनमोलप्रीत सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, आमच्या समाजासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी हा एक धक्का आहे आणि कधीही न भरुन येणारे नुकसान आहे. उज्ज्वल भविष्यासाठी ती कॅनडाला आली होती, परंतु दुर्दैवाने तिचे आयुष्य संपले, असे सिंग म्हणाले. (हेही वाचा, 'Game of Thrones' चॅटबॉट सोबत जुळलं भावनिक नातं, 14 वर्षीय मुलाने केली आत्महत्या; आईने Character.AI ला खेचलं कोर्टात)

कॅनडा पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, मृत्यूची पुष्टी झाली आहे. मात्र, अजूनही तपास सुरु आहे. मत्यूचे कारण अद्याप पुढे न आल्याने ही हत्या आहे की, मत्यू की अपघाती मृत्यू याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आला नाही. तरुण महिलेच्या मृत्यूच्या नेमके कारण जाणून घेण्यासाठी पंचनामा केला जात आहे. त्यासाठी आसपासची परिस्थिती समजून घेत माहिती गोळा करण्यासाठी अधिकारी काम करत आहेत.

दरम्यान, पोलिस आणि इतर अधिकारी त्यांची चौकशी सुरू ठेवत असल्याने वॉलमार्टचे दुकान शनिवारी रात्रीपासून बंद केले आहे. ही घटना जिथे घडली त्या बेकरी विभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि वॉलमार्टचे कर्मचारी तपासकर्त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. अधिक तपासात नेमकी माहिती पुढे येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.