Hafiz Abdul Rahman Makki Dies: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की चा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अशाच एका रॅलीत, मक्कीने काश्मीर पाकिस्तानला न दिल्यास भारतात “रक्ताच्या नद्या” वाहतील अशी धमकी दिली होती.

Hafiz Abdul Rahman Makki Dies: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की चा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Hafiz Abdul Rehman Makki (Photo Credits: X/ @AdityaRajKaul)

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर ए तयब्बा चा दहशतवादी Hafiz Abdul Rehman Makki यांचा पाकिस्तान मध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडीया रिपोर्ट्सनुसार, मक्की ला महुमेहाचा त्रास होता. त्याच्यावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र कार्डिएक अरेस्टने त्याचा मृत्यू झाला आहे.LeT चा म्होरक्या हाफिज सईदचा मेहुणा आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावा (JuD) चा उपप्रमुख, मक्की 2020 मध्ये terror financing केल्याबद्दल दोषी ठरल्यापासून लोकांच्या नजरेपासून दूर होता.

Jamaat-ud-Dawa (JuD) कडून Hafiz Abdul Rahman Makki च्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. लाहोरच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर मधुमेहासाठी उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा:  Abdul Rehman Makki चा समावेश UNSC कडून Global Terrorist च्या यादीत.

कोण होता Abdul Rehman Makki

. LeT चा संस्थापक Hafiz Saeed चा Abdul Rehman Makki हा मेव्हणा होता. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. या हल्ल्यामध्ये 175 जणांचा जीव गेला होता तर 300 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले होते. त्याला 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याची संपत्ती फ्रीझ करण्यात आली होती, प्रवासी बंदी आणि शस्त्रास्त्रबंदी लागू करण्यात आली होती.

प्रक्षोभक वक्ता असलेला मक्की हा इस्लामाबादमधील फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या काश्मीर एकता दिनाच्या रॅलीमध्येही नियमित येत होता. मुंबई हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अशाच एका रॅलीत, मक्कीने काश्मीर पाकिस्तानला न दिल्यास भारतात “रक्ताच्या नद्या” वाहतील अशी धमकी देऊन गेला होता. बळजबरीने ते ताब्यात घेण्याची धमकीही त्याने दिली होती.

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2024 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).