Bird Flu: मानवी शरीरात पहिल्यांदाच आढळला H3N8 बर्ड फ्लू संसर्ग, चीनमध्ये सापडला पहिला रुग्ण
चीनच्या हेनान प्रांतातील (Henan Province) एका व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू चा एच3एन8 (H3N8) स्ट्रेन सापडला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती पुढे आली आहे.
कोविड-19 विषाणूच्या कितीतरी आगोदर जगभरात परसलेला H3N8 बर्ड फ्लू हा विषाणू प्रथमच मानवी शरीरात आढळून आला आहे. चीनच्या हेनान प्रांतातील (Henan Province) एका व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू चा एच3एन8 (H3N8) स्ट्रेन सापडला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती पुढे आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य (NHC) कडून याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात अशा प्रकारचा स्ट्रेन सापडला आहे. मात्र त्याचा धोका अगदिच कमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने H3N8 बाबत अधिक माहिती देताना म्हटले की, चार वर्षाच्या मुलगाही या स्ट्रेनमुळे संक्रमित झाल होता.
एनएचसीने दिलेल्या माहितीनुसार, या स्ट्रेनमध्ये रुग्णाला ताप आणि इतरही अनेक लक्षणे पाहायला मिळतात. ज्या मुलाला या H3N8 स्ट्रेनची लागन झाली होती. दिलासादायक बाब अशी की या मुलाच्या संपर्कात आलेल्या कोणताही व्यक्ती H3N8 मुळे संक्रमित आढळून आला नाही. याचाच अर्थ असा की, हा स्ट्रेन संपर्कात आल्याने वाढत नाही. एनएचसीने माहिती देताना सांगितले की, हा मुलगा घरी पाळलेल्या एका कोंबडी आणि कावळ्याच्या संपर्कात आला होता. त्याच्यात ताप आणि इतर काही लक्षणे आढळून आली होती.
चीनच्या आरग्य विभागाने म्हटले की H3N8 संक्रमनापूर्वी जगभरात घोडे, कुत्रा आणि पक्षांमध्ये आढळून आला होता. दरम्यान, एच3एन8 चे कोणतेही मानवी प्रकरण पुढे आले नाही. मात्र, सध्या आढळून आलेला हा जगभरातील पहिलाच रुग्ण आहे.