Grammy Awards 2021: ग्रॅमी अवार्डमध्ये प्रसिद्ध गायक बियांसेने बनवला नवा विक्रम; पहा यंदाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

रविवारी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होेते.

Grammy Award 2021 (PC - Wikimedia Commons)

Grammy Awards 2021: यंदा संगीत क्षेत्रातील सर्वोत लोकप्रिय ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. कोरोना साथीच्या आजारामुळे हा पुरस्कार कार्यक्रम या वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्यात आला होता. यावर्षी 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन 31 जानेवारी रोजी होणार होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम 14 मार्च रोजी घेण्यात आला. रविवारी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. यावेळी या पुरस्कार सोहळ्याचे संचलन प्रख्यात कॉमेडियन आणि टॉक शो होस्ट ट्रेवर नोआह यांनी केलं.

दरवर्षी प्रमाणे, 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये काही नवीन गायक आणि गाण्यांनी आपले स्थान टिकवत हा प्रसिद्ध गायन पुरस्कार मिळवला. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक बियांसेने 28 व्या वेळी हा पुरस्कार जिंकला आहे. चला तर मग यावर्षीच्या ग्रॅमी पुरस्काराची संपूर्ण यादी जाणून घेऊयात... (वाचा - Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या 6 व्या वर्षी केलं होत 'संघर्ष' चित्रपटात काम; रणबीर कपूरच्या आधी 'या' अभिनेत्याशी जोडण्यात आलं नाव)

ग्रॅमी पुसस्कार विजेत्यांची यादी - 

रविवारी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 63 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कोरोना विषाणू संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून ग्रॅमी पुरस्करा सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.