प्रियकराची हत्या, डोके, लिंग कापून बादलीत ठेवले; ड्रग्जच्या नशेत उत्तेजीत महिलकडून Sex Game दरम्यान कृत्य
महिलेने प्रियकराची हत्या करुन त्याचे शीर धडावेगळे केले. महिला इतक्यावरच थांबली नाही तर तिने प्रियकराचे डोके आणि लिंग कापले आणि ते एका बादलीत ठेवले.
प्रियकरासोबत ड्रग्जच्या नशेत सेक्स गेम (Sex Game) दरम्यान महिलेकडून थरारक कृत्य घडले आहे. महिलेने प्रियकराची हत्या करुन त्याचे शीर धडावेगळे केले. महिला इतक्यावरच थांबली नाही तर तिने प्रियकराचे डोके आणि लिंग कापले आणि ते एका बादलीत ठेवले. दरम्यान, तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. कोर्टात बाजू मांडताना नशेत असताना हे कृत्य केले. त्यामुळेती दोषी नसल्याचा दावा तिच्या वकीलाने कोर्टात केले.
टेलर डेनिस स्कॅबिझनेस असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती 25 वर्षांची आहे. प्रियकर थायरिन (वय 25) याची फेब्रुवारी 2022 मध्ये कथितरित्या हत्या केल्याचा आरोप टेलर डेनिस स्कॉबिझनेस हिच्यावर आहे. तिच्यावर हत्येसोबतच मृतदेहाचे विद्रुपीकरण करणे, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणे असे आरोप आहेत. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोपही करण्यात आला आहे. (हेही वाचा, Man Kilss Entire Family: पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने संपूर्ण कुटुंबच संपवले; बायको, 5 मुले आणि सासूवर गोळी झाडून स्वतः केली आत्महत्या)
आरोपी महिलेच्या वकिलांनी कोर्टात दावा केला आहे की, त्याची आशील ही मानसिकदृष्टा सुस्थितीत नाही. तिच्यावर काय आरोप केले जात आहेत हे तिला कळत नाही. त्यामुळे सध्यास्थितीत तिच्यावर खटला चालविण्यासाठी ती तेवढी सक्षम नसल्याचे वकीलांनी म्हटले आहे. थायरियनच्या मृत्यूची बातमी मिळताच पोलिसांनी आरोपी महिलेच्या घराची झडती घेतली. या वेळी थायरियनचे डोके आणि लिंग बादलीत आढळून आले. तर, त्याच्या शरीराचे इतर अवयव घराभोवती विखूरलेले आढळून आले. पोलिसांनी महिलेला अटक करावी यासाठी न्यायालयाने यापूर्वीच अटक वॉरंट काढले होते.