Emmanuel Macron, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोरोनाच्या विळख्यात; COVID 19 ची लागण झाल्याने सेल्फ आयसोलेट
फ्रान्समधील कोविड 9 नियमावली नुसार ते पुढील 7 दिवस विलगीकरणात राहणार असले तरीही त्यांची काम सुरू राहतील.
फ्रान्सचे अध्यक्ष Emmanuel Macron यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (17 डिसेंबर) French presidency कडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कोविड 19 चं पहिले लक्षण दिसताच त्यांनी चाचणी करून घेतली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षण दिसत असल्याने सध्या Emmanuel Macron हे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार आहे. फ्रान्समधील कोविड 9 नियमावली नुसार ते पुढील 7 दिवस विलगीकरणात राहणार असले तरीही त्यांची काम सुरू राहतील. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा ते मिटींग घेणार असल्याचंही सांगण्यात आले आहे.
Emmanuel Macron हे जगातील अग्रगण्य नेत्यांमधील एक नाव आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प, युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी या आजारावर मात केली आहे. युरोपामध्ये कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये बिकट परिस्थिती झालेल्या देशांमध्ये फ्रांसचा समावेश आहे. फ्रांसमध्ये काल 17,615 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. हा 21 नोव्हेंबर पासून आत्तापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांचा एका दिवसांतला मोठा आकडा आहे.
10-11 डिसेंबरला Macron हे European Council heads of state च्या मिटिंगमध्ये सहभागी होते. दरम्यान मागील काही दिवसांतच त्यांच्या सानिध्यात आलेल्यांनादेखिल खबरदारी घेण्याचा सल्ला आहे. French Prime Minister Jean Castex देखिल सेल्फ आयसोलेट झाले आहेत. Second Wave of COVID-19 in France: कोरोना व्हायरस संक्रमणाची दुसरी लाट; फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों यांच्याकडून अनेक शहरांमध्ये जमावबंदी.
कोरोना वायरसचा फैलाव फ्रांसमध्येही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या जागतिक आरोग्यसंकटाला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत 2,409,062 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल दिवसभरातील मृतांचा आकडा 289 होता तर एकूण 59,361 जणांचा मृत्यू झाला आहे.