Facebook Suspends Donald Trump's Account: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट दोन वर्षांसाठी निलंबीत

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे फेसबुक अकाऊंट (Facebook Account) दोन वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.

Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांना फेसबुकने जोरदार धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे फेसबुक अकाऊंट (Facebook Account) दोन वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींबाबत फेसबुक (Facebook) खात्यांबाबत फेसबुकची नियमावली आहे. या नियमावलींचे उल्लंघन झाल्याचे कारण देत फेसबुकने ही कावाई केली आहे.

फेसबुकशी अकाऊंटशी संबंधीत प्रकरणे कंपनीच्या वतीने हाताळण्याची जबबदारी असलेल्या निक क्लेग यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही आज असाधारण प्रकरणात लागू असणाऱ्या नव्या प्रोटोकॉलची घोषणा करत आहोत. आमही या प्रोटोकॉलनुसार आम्ही निश्चित कालावधीसाठी कारवाई करण्यास बांधील आहोत. त्यामुळे या प्रोटोकॉलनुसार आम्ही ट्रम्प यांचे खाते दोन वर्षांसाठी निलंबीत करत आहोत. ट्रम्प यांचे अकाऊंट 7 जानेवारी 2021 पासून निलंबीत करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था सिन्हाआच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात आयएनएसने म्हटले आहे की, कंपनी ट्रम्प यांच्यावरील निर्बंधांचे पूनर्वमुल्यांक करेल आणि पुढील निर्णय देईल. या निर्णयात ट्रम्प यांच्या अकाऊंटच्या निलंबनाचा कालावधी निश्चित काळापर्यंतच ठेवण्यात येईल की वाढविला जाईल याबाबत माहिती दिली जाईल. क्लेग यांनी म्हटले आहे की, जर आम्ही निश्चित केले आहे की, सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठी जोखीम असेल तर आम्ही त्यावर निर्बंध अधिक घट्ट करण्याबाबत पुनर्मुल्यांकन कायम ठेऊ. त्यांनी पुढे म्हटले की, जर निलंबंन हटविण्यात आले तर ट्रम्प यांच्याकडून भविष्यात नियमांचे आणखी उल्लंघन केले जाऊ नये. अन्यथा त्यांचे फेसबुक अकाऊंट कायमस्वरुपी हटविण्यात येईल. (हेही वाचा, New York: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी Trump Organization चौकशीच्या फेऱ्यात)

फेसबुकने म्हटले आहे की, नव्या नियमांनुसार उल्लंघनकर्त्याचे अकाऊंट एक महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत निलंबीत केले जाऊ शकते. ही कारवाई युजर्सने कोणत्या प्रकारचे उल्लंघन केले आहे त्यावर अवलंबून असेल.