Benjamin Netanyahu: इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला; दारात आगीचे लोट (Watch Video)
बॉम्ब त्यांच्या घराच्या अंगणात पडले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर पुन्हा हिजबुल्लाहचा हल्ला झाला आहे. त्यांच्या सीझेरिया येथील घरावर हा हल्ला झाला आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने दोन फ्लेअर उडवण्यात आले, जे त्यांच्या घराच्या अंगणात पडले. इस्रायली पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. हा हल्ला कुठून झाला आणि कोणी केला याची माहिती सध्या उपलब्ध नाही. (Israel Airstrikes On Hezbollah: लेबनॉनवर गेल्या 24 तासांत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 7 ठार, 65 जखमी)
हिजबुल्लाहचा हल्ला
इस्त्रायली सुरक्षा एजन्सी शिन बेटने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. हल्ल्याच्या वेळी नेतन्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी 19 ऑक्टोबरला नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहने हल्ला केला होता. त्यानंतर नेतान्याहू यांच्या घराजवळील इमारतीवर ड्रोन पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळीही नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा घरी नव्हते.
आयर्न डोम असूनही इस्त्रायल हल्ले का थांबवू शकत नाही?
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला पाडण्यात इस्रायलला फारशी अडचण येत नाही, असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. मात्र कमी पल्ल्याच्या रॉकेट किंवा ड्रोन पकडण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत आहेत. नेतान्याहू यांच्या घरावर गेल्या वेळी ड्रोनने हल्ला केला होता, तेव्हा फक्त एक ड्रोन पाडण्यासाठी इस्रायलला चार लढाऊ विमाने आणि एक क्षेपणास्त्र सोडावे लागले होते.
नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला
ड्रोन खूप कमी उंचीवर उडते. त्यावेळी त्याला लक्ष्य करणे धोकादायक ठरू शकत होते. कारण ते स्फोटकांनी भरलेले होते. यामुळे घरांचे आणि लोकांचे नुकसान होऊ शकते. इस्त्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन किंवा क्षेपणास्त्राने मोठ्या प्रमाणावर हल्ला होत असला तरी त्याला सामोरे जाण्यासाठी इस्रायलकडे पुरेशी व्यवस्था नाही.