Heavy Rain in Guangdong China: चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात मुसळधार पाऊस, पूरामुळे पाच जणांचा मृत्यू
या पावसामुळे परिसरात मोठा पूर आला आणि भूस्खलनाच्या दुर्घटनेमुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर 15 जण बेपत्ता झाले.
Heavy Rain in Guangdong China: दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात सोमवारी मुसळधार पाऊस होता. या पावसामुळे परिसरात मोठा पूर आला आणि भूस्खलनाच्या दुर्घटनेमुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर 15 जण बेपत्ता झाले. अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यानी दिली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे ग्वांगडोंग प्रांतातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (हेही वाचा- न्यू मेक्सिको येथे जंगलाला लागेल्या वणव्यात 3,300 एकर जमीन जळून भस्मसात; सरकारकडून आपत्कालीन स्थलांतराचे आदेश)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी प्रांतातील मीझौ शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात मोठा पूर आला. पूराच्या घटनेमध्ये अनेक घरे पाण्यात बुडाली आहे. पाण्यात अनेक वाहने वाहून गेली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पूर आल्याने लोकांचे स्थंलातर होत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुक सेवा ठप्प झाली आहे.
वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे अनेक घरे ढिगाऱ्याखाली गेली आहे. त्यामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण अडकले आहे. हेलकॉप्टर आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. नागरिकांना ढिगाऱ्याखालून वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुरामुळे मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीला चीन शहरात पावसाने झोडपले आहे.