अमेरिकेचे 'चिनुक' हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेत लवकरच होणार दाखल
गुजरात (Gujrat) येथील मुंद्रा विमानतळार अमेरिकेच्या 'चिनुक'(Chinook) हेलिकॉप्टरची पहिली बॅच पोहचली आहे.
गुजरात (Gujrat) येथील मुंद्रा विमानतळार अमेरिकेच्या 'चिनुक'(Chinook) हेलिकॉप्टरची पहिली बॅच पोहचली आहे. तर लवकर हे हेलिकॉप्टर भारतीय वायूसेनेत (Indian Air Force) दाखल केले जाणार असल्याने त्यांची ताकद अधिकच वाढणार आहे. तर सियाचीन आणि लदाख येथे चिनुक हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी उपयोगाचे ठरणार आहे. तसेच 2015 रोजी भारत सरकारने अमेरिका (America) कडून 22 अॅपचे हेलिकॉप्टर्स आणि 15 चिनुक हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला होता. तर येत्या काही दिवसात 15 हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.
बोइंग सीएच-47 चिनुक गे अमेरिकेच्या सैन्यदलामधील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. तसेच पुढील आणि मागच्या बाजूस असलेले त्याचे मोठे पंख एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात हे त्याचे खास वैशिष्ट आहे. या हेलिकॉप्टरचे प्रथम उड्डाण 21 सप्टेंबर 1961 रोजी झाले होते. त्यानंतर व्हटरेल कंपनीने त्याला 1962 रोजी बोइंगने खरेदी केले. त्यामुळे या हेलिकॉप्टरला बोइंग सीएच-47 ए असे नाव ठेवण्यात आले.
तसेच 1962 रोजी चिनुक हे अमेरिकेच्या सैन्यात दाखल झाले. तर 40 वर्षापेक्षा अधिक काळ हे हेलिकॉप्टर 17 देशांच्या हवाई दलात यशस्वीपणे कार्य करत आहे.