Massive Fire Breaks Out Near FIFA World Cup City: फिफा विश्वचषक सुरु असलेल्या कतारमधील लुसेल शहरानजीक फॅन गावास भीषण आग, धुरामुळे आकाशात काळोखी

फिफा वर्ल्डकप सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांची सोय करण्यासाठी फॅना हे गाव तातडीने वसविण्यात आले आहे.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) सामने सुरु असलेल्या कतारमधील लुसेल ( Lusail city in Qatar) शहरानजीक वसविन्यात आलेल्या फॅना (Fan Village)  गावात मोठी आग ( Massive Fire Breaks Out At Fan Village) भडकली आहे. फिफा वर्ल्डकप सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांची सोय करण्यासाठी फॅना हे गाव तातडीने वसविण्यात आले आहे. आग भडकल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मोठ्या प्रमाणावर आग भडकल्याने आगीचे लोटच्या लोट आकाशात उसळत आहेत. मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात पसररल्याने परिसरात काळोखी पाहायला मिळत आहे. धुरामुळे अंधारमय वातावरण झाल्याने आग नेमकी कोणत्या ठिकाणी भडकली आहे याबाबात माहती मिळू शकली नाही.

डेली मेल या वेबसाईटने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ही आग भडकली आहे. अधिकाऱ्यांनी सकाळी 10 नंतर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये चाहत्यांना आणि रहिवाशांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले की आग मैल दूरवरून दिसत आहे.

व्हिडिओ

कतारच्या पूर्व किनार्‍यावरील राजधानी दोहाच्या उत्तरेला, लुसेल शहरात, कॅनव्हासच्या तंबूंनी बनलेले गाव सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. कतार सरकारने पाठिमागील आठवड्यातच सुरु झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेपूर्वी लाखो पौंड खर्च करुन फॅना हे गाव वसवले आहे.