प्रसिद्ध Porn Star अभिनेत्री Carol Maltese ची निर्घृण हत्या; आरोपीने शरीरासोबत केले 'हे' कृत्य, आपबीती ऐकून उडेल थरकाप!
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अशी घटना घडली आहे. जी वाचून तुमचा थरकाप उडेल. या 26 वर्षीय अभिनेत्रीवर एका बँकरने हातोड्याने वार केले. त्यानंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि नंतर शरीराचे तुकडे एका गोणीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. पोलिसांनी अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. डेविड फोंटाना (Davide Fontana) असे या आरोपीचे नाव असून त्याचे वय 43 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॅरोल माल्टेसी (Carol Maltese) असे मृत अभिनेत्रीचे नाव असून तिला शार्लोट एंजी या नावानेही ओळखले जाते. 20 मार्च रोजी लोम्बार्डी भागातील पालिन गावाजवळील एका कड्यावर महिलेचा विकृत मृतदेह आढळून आला होता. यूके डेली मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी आरोपींनी आधी अभिनेत्रीवर हातोड्याने वार केल्याचा पोलिसांना संशय होता. ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्यात आला. (हेही वाचा - Hollywood Movie On Plumber: रानू मंडल पेक्षाही वेगाने बदलले 'प्लंबर'चे नशीब; हॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणार Kev Crane चा जीवनप्रवास)

या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी डेव्हिड फोंटाना नावाच्या 43 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपींवर खून, पुरावे नष्ट करणे, मृतदेह लपवणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान आरोपी बँकरने अभिनेत्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने जानेवारीमध्ये अभिनेत्रीची हत्या करून मृतदेह काही दिवस फ्रीझरमध्ये ठेवला होता. सुमारे महिनाभरानंतर तो फेकून देण्यात आला. अभिनेत्रीला तिच्या चाहत्याने ओळखले. ही मृत अभिनेत्री मिलानच्या रेस्काल्डिना नगरपालिकेत राहत होती.

कॅरल माल्टेसीने ऑनली फॅन्सवर एडल्ट कंटेंट पोस्ट केला. त्यानंतर तिने पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला. अभिनेत्री 11 ते 13 मार्च दरम्यान लक्सी इरोटिक फेस्टिव्हल 2 मध्ये भाग घेणार होती.