Elon Musk Biggest Loss: एलोन मस्क ठरले 200 अब्ज डॉलर्स गमावणारी इतिहासातील पहिली व्यक्ती, जाणून घ्या कारण

त्यानंतर सलग एक वर्षाहून अधिक महिने ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. त्यानंतर त्यांना या महिन्यात फ्रेंच व्यवसायिक आणि लक्झरी गुड्स पॉवरहाऊस LVMH चे सह-संस्थापक बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी मागे टाकले.

Elon Musk | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

ब्लूमबर्गच्या मते, एलोन मस्क (Elon Musk) हे तब्बल $200 अब्ज संपत्ती गमावणारी इतिहासातील पहिली व्यक्ती ठरले आहेत. आता त्यांची एकूण संपत्ती आता $137 अब्ज झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $340 अब्जावर पोहोचली होती, परंतु या महिन्यात बर्नार्ड अर्नॉल्ट हे मस्कला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. टेस्लाच्या समभागांच्या घसरणीमुळे या वर्षी इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती कमी झाली.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क हे मानवी इतिहासातील एकमेव व्यक्ती ठरले आहेत, ज्यांनी आपल्या एकूण संपत्तीतून $200 अब्ज गमावले आहेत. Amazon चे जेफ बेझोस नंतर, मस्क ही $200 अब्ज पेक्षा जास्त 'वैयक्तिक संपत्ती' असलेली दुसरी व्यक्ती होती. संपत्तीचा हा आकडा त्यांनी जानेवारी 2021 मध्ये गाठला होता.

अलिकडच्या आठवड्यात टेस्लाचे शेअर्स घसरल्याने एलोन मस्कची संपत्ती $137 अब्ज झाली. यामध्ये 27 डिसेंबर रोजी टेस्लाच्या समभागांमध्ये 11 टक्क्यांची मोठी घसरण समाविष्ट आहे. टेस्लाने आता चीनमधील शांघाय प्लांटमधील आपले उत्पादन कमी केले आहे, दुसरीकडे यूएस मधील ग्राहकांना वर्षाच्या समाप्तीपूर्वी आपल्या दोन उच्च-वॉल्यूम मॉडेल्सवर $7,500 पर्यंत सूट देत आहे. याचाही परिणाम मस्क यांच्या संपत्तीवर झाला.

मस्क यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस 44 अब्ज डॉलर्समध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतले. मस्क यांनी ट्विटर खरेदी कव्हर करण्यासाठी टेस्लामधील आपला महत्त्वपूर्ण हिस्सा विकला. आता इलेक्ट्रिक कार निर्माता ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती राहिलेली नाही. मस्कच्या ट्विटर अधिग्रहणानंतर, गुंतवणूकदारांनी टेस्लाचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे मस्कची निव्वळ मालमत्ता नोव्हेंबरपर्यंत खूप कमी झाली. (हेही वाचा: ट्विटर कर्मचार्‍यांना घरून आणावा लागत आहे टॉयलेट पेपर; पैसे वाचवण्यासाठी Elon Musk यांचा नवा फंडा)

दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये, मस्कची संपत्ती $ 340 अब्जच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर सलग एक वर्षाहून अधिक महिने ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. त्यानंतर त्यांना या महिन्यात फ्रेंच व्यवसायिक आणि लक्झरी गुड्स पॉवरहाऊस LVMH चे सह-संस्थापक बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी मागे टाकले.