इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचे निधन; वयाच्या 91 वर्षी घेतला अखेरचा श्वास
इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक (Hosni Mubarak has Died) यांचे निधन झाले असून वयाच्या 91 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. होस्नी मुबारक यांनी तब्बल तीस वर्षे राज्य होकेले होते. तब्बल 18 दिवसाच्या विरोध प्रदर्शनानंतर 11 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. होस्नी मुबारक सत्तेवर असताना इजिप्त आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारले होते. तसेच त्यांनी इस्रायलशी शांतता करार केला होता. मात्र, 2011 साली इजिप्त येथील नागरिकांनी मोठ्या संख्येत होस्नी मुबारक यांच्या सत्तेला आव्हान दिले होते. त्यावेळी तहरीर चौकात त्यांच्या विरोधात अंदलोन करणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. परिणामी होस्नी मुबारक यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये त्यांची मुक्तता झाली होती.
इजिप्त मध्ये पुर्वेत तब्बल 30 वर्ष शांतता प्रस्थापित करणारा नेता म्हणून होस्नी मुबारक यांना ओळखले जाते. आज त्यांचे निधन असून वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. परंतु, 2011 मध्ये इजिप्तच्या लोकांनी होस्नी मुबारक यांचे सरकार खाली खेचले होते. ही बातमी समजल्यानंतर लोकांनी आज राजधानीत जल्लोष केला होता. तसेच लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवून आणि एकमेकांना मिठ्या मारून आनंद साजरा केला होता. महत्वाचे म्हणजे, इजिप्तमधील जनतेने मुबारक यांच्याविरूद्ध आंदोलन पुकारले होते. या काळात मुबारक यांनी वारंवार सत्ता सोडणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, अखेर त्यांनी 11 फेब्रुवारी जनमतापुढे माघार घेत पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, इराणच्या प्रेस टीव्हीने मुबारक देश सोडून परांगदा झाल्याचे वृत्त दिले होते. त्यांच्यासोबत लष्करप्रमुखही शर्म अल शेख येथील रेड सी रिसॉर्टमध्ये आहेत. असे वृत्त या वृत्तवाहिनीने दिले होते. मुबारक यांनी आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती उमर सुलेमान यांच्याकडे सोपवले आहेत, असे अमेरिकेतील इजिप्तचे राजदूत समह शोक्रे यांनी सांगितले होते. हे देखील वाचा- दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूची 60 नवीन प्रकरणे; चीननंतर सर्वात जास्त 893 व्यक्तींना लागण, देशात हाय अलर्ट जारी
एएनआयचे ट्वीट-
होस्नी मुबारक यांच्या विरोधात 2011 नागरिकांनी अंदोलन पुकारले होते. त्यावेळी निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, या गोळीबारात 900 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली होती.