69 वर्षाचे आजोबा म्हणातायत वय कमी करा, न्यायालयात याचिका दाखल
तर वाढत्या वयात माणसे स्वत:ला 16 वर्षातील तरुण किंवा तरुणी सारखे दिसण्यासाठी खूप मेहनत घेतात.
वाढत्या वयाला बंधन नसते. तर वाढत्या वयात माणसे स्वत:ला 16 वर्षातील तरुण किंवा तरुणी सारखे दिसण्यासाठी खूप मेहनत घेतात. असाच एक प्रकार द हेग येथे घडला आहे. 69 वय वर्ष असलेल्या आजोबांनी त्यांचे वय 20 वर्षे करावे म्हणून चक्क न्यायालयात धाव घेतली आहे.
डेन्मार्क (Denmark) मधील 69 वर्षीय एमिल रेटलबँड (Emile Ratelband) हे प्रेरक वक्ते आहेत. तर त्यांना आपण 20 वर्षीय आहोत असे वाटत आहे. मात्र एमिल यांनी आपले वय 20 वर्ष करावे अशी याचिका न्यायलायत दाखल केली आहे. परंतु न्यायलयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने, 'एमिल हे स्वत:ला 20 वर्षीय तरुण समजत असतील तर त्यांना असे वाटण्यास पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे ते 20 वर्षीय तरुणासारखे जगू शकतात. मात्र वय 69 असून ते 20 वर्ष करण्याचा आम्ही आदेश देणार नाही' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण असे झाल्यास त्यांची जन्मापासून ते लग्नापर्यंतची सर्व कागदपत्रे यांच्यामध्ये बदल करावा लागेल.
एमिल यांनी त्यांच्या मूळ वयामध्येच अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेतला आहे. मग त्यांना फक्त मानसिक समाधान मिळण्यासाठी वयात बदल करायचा असेल तर ते शक्य नाही म्हणत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. तर एमिल हे न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजगी व्यक्त करत आहेत.