Animal Bloodbath by Nnine-Year-Old Boy: नऊ वर्षांच्या मुलाकडून प्राण्यांचा रक्तपात; ससे आणि गिनी डुकरांची हत्या
नेदरलँडमधील प्राणीसंग्रहालयात एका अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने प्राण्यांचा अक्षरश: रक्तपात केला आहे. त्याने जवळपास नऊ ससे आणि दोन गिनी डुकरांना ठार मारले. त्याने या आकरा प्राण्यांचा गळा दाबून त्यांना ठार मारले. धक्कादायक म्हणजे त्याने हे कृत्य प्राणीसंग्रहालयात एकट्याने फिरत असताना केले.
Boy Kills Rabbits Guinea Pigs in Netherland Zoo: नेदरलँडमधील प्राणीसंग्रहालयात एका अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने प्राण्यांचा अक्षरश: रक्तपात केला आहे. त्याने जवळपास नऊ ससे आणि दोन गिनी डुकरांना ठार मारले. त्याने या आकरा प्राण्यांचा गळा दाबून त्यांना ठार मारले. धक्कादायक म्हणजे त्याने हे कृत्य प्राणीसंग्रहालयात एकट्याने फिरत असताना केले. इतका क्रूर हल्ला केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते तसेच केलेल्या कृत्याबाबत तो कोणतीही भावना व्यक्त करत नव्हता. अत्यंत निर्विकार चेहऱ्याने तो वावरत होता. त्याच्या वर्तनामुळे प्राणीसंग्रहालयातील कर्मचारीही गोधळून गेले. या घटनेची नागरिकांमध्येही जोरदार चर्चा आहे.
नेदरलँडमधील अल्कमार येथील रेकरहाउट पेटिंग प्राणीसंग्रहालयात घडलेल्या या घटनेने लहान मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या जगभरातील अभ्यासकांमध्ये खळबळ उडाली आहे. मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 11 मार्च रोजी घडली. हे कृत्य करणाऱ्या मुलाची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, वृत्तात म्हटले आहे की, सदर मुलाने त्याने प्राणीसंग्रहालयात एकट्याने प्रवास केला आणि कोणताही स्पष्ट हेतू नसताना नऊ ससे आणि दोन गिनी डुकरांना ठार मारले. (हेही वाचा, Tug of War vs a Lion Video: सिंह खेळतोय रस्सीखेच; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक अली डोरेनबोस यांनी मीडिया संस्थेशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या पालकांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र, त्याचे वय 12 वर्षांपेक्षाही कमी असल्याने त्याला गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागणार नाही. असे असले तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तत्पूर्वी त्याला बालसुधारगृहामध्ये पाठविण्यात येईल. आमच्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा मृत्यू झाल्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. पण, ज्या मुलाने हे कृत्य केले त्याच्याबद्दलही वाईट वाटते. त्याच्या मनात हिंसेची भावना निर्माण व्हावी, जी त्याने प्राण्यांची हत्या करुन पूर्ण करावी, हे अनाकलनीय आहे. लहान मुलांमध्ये प्राण्यांबद्दल प्रेम आणि आदराची भावना निर्माण करायला हवी. आपण घरामध्येही लहान मुलांना प्राण्यांबद्दल आपुलकीने वागायला शिकवायला हवे, असे डोरेनबोस म्हणाले. (हेही वाचा, Viral Video: महाकाय अजगराने गिळला ससा, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
दरम्यान, द मिररने या घटनेबद्दल दिलेल्या वृत्तानुसार, युकेतील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एक क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये एक मुलगा प्राण्यांना जखमी करुन मारत असल्याचे दिसते आहे. हा मुलगा प्रथम लगोरीने (catapult) या प्राण्यांना मारतो आहे. त्यानंतर ते जखमी झाले की त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी प्रहार करतो आहे. मीडिया संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 110 ग्रुप चॅटमध्ये सुमारे 500 सदस्यांनी प्राणयांच्या हत्येचे फुटेज शेअर केले आहेत. घडलेल्या घटनेबद्दल सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)