Diwali At White House: व्हाईट हाउस उजळणार दिव्यांनी; 24 ऑक्टोबरला Donald Trump साजरी करणार दिवाळी

अमेरिकेमध्येही दिवाळीची लगबग दिसू लागली आहेत. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) उद्या, 24 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाउसमध्ये (White House) दिवाळी साजरी करणार आहेत.

डोनाल्ड ट्रंप (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतात दिवाळीच्या (Diwali 2019) सणाची धामधूम सुरु झाली आहे. भारतासह इतर अनेक देश दिवाळी साजरी करतात. अमेरिकेमध्येही दिवाळीची लगबग दिसू लागली आहेत. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) उद्या, 24 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाउसमध्ये (White House) दिवाळी साजरी करणार आहेत. भारतात दिवाळी सुरु होण्याच्या तीन दिवस आधी ट्रंप दिवाळी साजरी करतील. डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाउसमधील ही तिसरी दिवाळी असणार आहे. व्हाईट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी 2009 साली सुरु केली होती.

व्हाईट हाउसमध्ये दीप प्रज्वलन करून ट्रंप दिवाली साजरी करतील. याबाबत अजून जास्त माहिती मिळू शकली नाही. ट्रंप यांनी 2017 साली व्हाइट हाउसमध्ये आपली पहिली दिवाळी साजरी केली होती. त्यावेळी भारतीय-अमेरिकन समुदायातील निवडक काही नेते आणि ट्रंप प्रशासनाचे काही सदस्य उपस्थित होते. मागच्या वर्षी गेल्या वर्षी ट्रंप यांनी अमेरिकेतील तत्कालीन भारतीय राजदूत नवतेजसिंह सरना यांना दिवाळी साजरी करण्यासाठी रुझवेल्ट रूममध्ये आमंत्रित केले होते.

भारताप्रमाणेच अमेरिकेतही दिवाळीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अ‍ॅबॉट यांनी शनिवारी भारतीय-अमेरिकन समुदायासह दिवाळी साजरी केली. राज्यपालांच्या निवासस्थानी दिवे लावून दिवाळी साजरी केली. यासोबतच टेक्सासमधील रिपब्लिकन पार्टीचे पीट ओल्सन यांनीही स्वामीनारायण मंदिरात दिवाळीचा सण साजरा केला.