Donald Trump Warns Bloodbath: 'यूएस अध्यक्षपदी निवड न झाल्यास रक्तपात करेन', डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

US Presidential Elections: अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडेन (Joe Biden) विरुद्ध माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US Presidential Elections) असा सामना रंगतो आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

Donald Trump (PC - File Image)

US Presidential Elections: अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडेन (Joe Biden) विरुद्ध माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US Presidential Elections) असा सामना रंगतो आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. ज्याची जगभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. आगामी निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपणच निवडून यायला पाहिजे. अन्यथा देशाला मोठ्या रक्तपाताला (Bloodbath) सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमी अथवा दृष्टीकोणातून केले हे समजू शकले नाही. मात्र त्यांच्या इशाऱ्याने खळबळ उडाली आहे. ऑटोमोबाईल उद्योगाबाबत मत मांडताना त्यांनी हे विधान केले. ओहायो येथील एका प्रचारसभेत ते शनिवारी बोलत होते.

अमेरिकेतील ऑटो उद्योबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी या उद्योगातील आव्हानांवर चर्चा केली. त्यांनी म्हटले की, आपण सत्तेत येताच चीनची यूएसला होणारी वाहन निर्यात कमी केली जाईल. मात्र, या निवडणुकीत आपला पराभव झाला तर त्याचे परिणाम गंभीर होतील. जो बायडेन यांच्या विरोधात प्रचारादरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे विधान आले आहे. अमेरिकेत 6 जानेवारी, 2021 रोजी झालेल्या दंगलीवरुन जोरदार चर्चा सुरु असतानाच सन 2020 च्या निवडणुक निकालाबाबत निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प वातावरण भावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवडणूक अभ्यासकांचे मत आहे. (हेही वाचा, Nobel Peace Prize Nominations: इलॉन मस्क यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; Donald Trump, Julian Assange यांच्याशी असणार स्पर्धा)

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आपल्या भाषणात 6 जानेवारीच्या घटना समोर आणत, नोव्हेंबरच्या निवडणुकीचा निकाल लोकशाहीच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. हा हल्ला रिपब्लिकन आणि ट्रम्प यांच्या मोहिमेसाठी राजकीय धोका आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी जाहीर केले की ते 2024 मध्ये ट्रम्प यांना समर्थन देणार नाहीत. 6 जानेवारी रोजी, कॅपिटॉल येथे ट्रम्प समर्थकांनी पेन्सला फाशी देण्याची मागणी केली होती जेव्हा त्यांनी 2020 मधील यूएस अध्यक्षीय निवडणूक उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात मदत करण्यास नकार दिल्याबद्दल त्यांना लक्ष्य केले होते. पेन्स यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, "डोनाल्ड ट्रम्प एका अजेंडाचा पाठपुरावा करत आहेत आणि आम्ही आमच्या चार वर्षांच्या काळात ज्या पुराणमतवादी अजेंडावर आम्ही शासन केले त्याच्याशी विसंगत आहे. म्हणूनच मी या मोहिमेत डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन देऊ शकत नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now