Donald Trump Nominated for Nobel Peace Prize: डोनाल्ड ट्रम्प 'नोबेल शांती पुरस्कार 2021' साठी नामांकित; Israel आणि UAE दरम्यान घडवला होता शांतता करार
यूएई (UAE) आणि इस्राईल (Israel) मध्ये शांतता करार (Peace Agreement) घडवून आणल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 2021 सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize 2021) नामांकन देण्यात आले आहे.
यूएई (UAE) आणि इस्राईल (Israel) मध्ये शांतता करार (Peace Agreement) घडवून आणल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 2021 सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize 2021) नामांकन देण्यात आले आहे. फॉक्स न्यूजच्या एमच्या अहवालानुसार, नॉर्वेच्या संसदेचे खासदार ख्रिश्चन टायब्रिंग गाजेडे (Christian Tybring-Gjedde) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले आहे. ख्रिश्चन टायब्रिंग हे नॉर्वे विभागाचे अध्यक्ष आहेत आणि ते नाटोच्या संसदीय सभेचा हिस्साही आहेत. ख्रिश्चन टायब्रिंग व्यतिरिक्त आणखी चार अर्ज दाखल झाले आहेत. इस्त्राईल आणि युएईने 13 ऑगस्ट रोजी हा शांतता करार जाहीर केला होता.
ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यावरच इस्रायल आणि युएईने शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि 72 वर्षांनंतर दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपले. 15 सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊसमध्येच त्याचा औपचारिक समारंभ होणार आहे. या करारामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्वाची भूमिका होती. कराराअंतर्गत इस्रायलने पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागातील आपला दावा सोडण्यास सहमती दर्शविली. त्याचबरोबर युएईने इस्रायल बरोबरचे संपूर्ण मुत्सद्दी संबंध परत आणण्याचे मान्य केले. असे करणारा हा पहिला आखाती देश ठरला.
टायब्रिंग म्हणाले की, ‘ट्रम्प यांनी फक्त इस्राईल आणि युएई दरम्यान झालेल्या करारासाठीच भूमिका बजावली नाही, तर उत्तर कोरिया आणि इराणशी शांततेत चर्चा करण्याचे आवाहन केले, जे कौतुकास्पद आहे. या पुरस्कारासाठी नामित इतर कोणत्याही सदस्यापेक्षा ट्रम्प यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक प्रयत्न केले आहेत. जेव्हा जेव्हा कोणत्याही दोन देशांमध्ये वाद उद्भवतात तेव्हा ट्रम्प यांनी तो सोडविण्यासाठी मध्यस्ती केली आहे, त्यामुळेच तेच या पुरस्कारासाठी योग्य उमेदवार आहेत.’ (हेही वाचा: भारतीय वंंशाच्या 'या' 7 अमेरिकन नागरिकांंचा फोर्ब्स च्या सर्वात श्रीमंंत व्यक्तींंच्या यादीत समावेश)
दरम्यान, नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणालाही नामांकित करण्यासाठी पात्र व्यक्ती ही एक लोकप्रिय व्यक्ती, राष्ट्रीय नेते, प्राध्यापक आणि पुरस्काराचा माजी विजेता असणे गरजेचे आहे. या पुरस्कारासाठी नामांकन दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये निवडले जातात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)