Donald Trump Naked Statue: अमेरिकेच्या लास वेगासमध्ये उभारला 43-फूट उंच डोनाल्ड ट्रम्प यांचा नग्न पुतळा, व्हिडिओ व्हायरल (Watch)
अमेरिकन राजकारणाचा अभ्यास करणारे एक विश्लेषक म्हणतात की, जर ट्रम्प 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाले तर, निवडणुकीनंतर दंगली उसळण्याची शक्यता आहे.
Donald Trump Naked Statue: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला (America Presidential Election 2024) आता अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. सर्वेक्षणात काही ठिकाणी ट्रम्प तर काही ठिकाणी कमला हॅरिस विजयी होत असल्याचे दिसत आहे. आता काल, 29 सप्टेंबर रोजी सिल्व्हर स्टेट नेवाडामध्ये कमला हॅरिसची रॅली पार पडली, त्यापूर्वी लास वेगासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा न्यूड पुतळा दिसला. लास वेगास हे नेवाडामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.
असे सांगण्यात येत आहे की ट्रम्पचा फोमचा बनलेला हा मोठा पुतळा येत्या काही काळासाठी असाच प्रदर्शित केला जाईल आणि येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणुकांपूर्वी तो देशभरात पसरवला जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 43 फूट उंच पुतळ्याचे वजन सुमारे 2800 किलो आहे.
ट्रम्प यांचे नग्न पुतळे प्रदर्शित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी 2016 मध्ये देखील अमेरिकेतील 6 शहरांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नग्न पुतळे लावण्यात आले होते. तेव्हाही त्याची बरीच चर्चा झाली होती आणि ट्रम्प समर्थकांनी खूप गोंधळ घातला होता. ट्रम्प यांच्या न्यूड पुतळ्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी गदारोळ होण्याची भीती पुन्हा एकदा वाढली आहे.
लास वेगासमध्ये उभारला 43-फूट उंच डोनाल्ड ट्रम्प यांचा नग्न पुतळा-
मीडिया आउटलेट TMZ ने अहवाल दिला की ट्रम्पचा पुतळा शुक्रवारी संध्याकाळी स्थापित करण्यात आला आणि काही काळ तसाच राहण्याची अपेक्षा आहे आणि यूएस मधील इतर शहरांमध्ये देखील प्रदर्शित केली जाईल. हा पुतळा तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ट्रम्प समर्थक या कलाकृतीला अश्लील आणि अत्यंत घृणास्पद कृत्य म्हणत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा न्यूड पुतळा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बहुतेकांनी याला एक हास्यास्पद निवडणूक स्टंट म्हटले आहे. या पुतळ्याचाही निषेध करण्यात आला आहे. (हेही वाचा: I Hate Taylor Swift: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत Kamala Harris यांना पाठिंबा दिल्यानंतर Donald Trump कडून टेलर स्विफ्टचा तिरस्कार)
दरम्यान, तज्ञांचे म्हणणे आहे की प्रारंभिक सर्वेक्षण आणि पहिल्या वादविवादानंतर कमला हॅरिस यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वरचष्मा आहे. अमेरिकन राजकारणाचा अभ्यास करणारे एक विश्लेषक म्हणतात की, जर ट्रम्प 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाले तर, निवडणुकीनंतर दंगली उसळण्याची शक्यता आहे.