पॉर्नस्टार Stormy Daniels हिच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अडचणीत? Stephanie Clifford सोबतचे प्रकरण काय?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी 2016 मध्ये झालेली निवडणूक प्रचंड गाजली. ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जिंकली. हा इतिहास झाला. पण हा इतिहास घडत असताना पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल (Stormy Daniels) हिच्याशी जोडले गेलेले नाव आणि कथीत आर्थिक व्यवहार यांवरुन सुरु झालेला वाद मात्र अद्यापही डोनाल्ड ट्रम्प यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.

पॉर्नस्टार Stormy Daniels हिच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अडचणीत? Stephanie Clifford सोबतचे प्रकरण काय?
Donald Trump, Stormy Daniels aka Stephanie Clifford | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Donald Trump and Stephanie Clifford News: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी 2016 मध्ये झालेली निवडणूक प्रचंड गाजली. ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जिंकली. हा इतिहास झाला. पण हा इतिहास घडत असताना पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल (Stormy Daniels) हिच्याशी जोडले गेलेले नाव आणि कथीत आर्थिक व्यवहार यांवरुन सुरु झालेला वाद मात्र अद्यापही डोनाल्ड ट्रम्प यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही. उलट हा वादा ट्रम्प यांना कायद्याच्या कचाट्यात अधिकच अडकवताना दिसतो आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित हे प्रकरण सध्या कोर्टात पोहोचले आहे.

प्रकरण नेमके आहे काय?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहे की त्यांनी स्टॉर्मि डॅनियल हिच्यासोबतचे 'संबंध' लपवले. इतकेच नव्हे तर आपल्या संबंधांची कुठेही वाच्यता करुन ये यासाठी 2016 मध्ये अध्यक्षीय प्रचारादरम्यान स्टॉर्मी डॅनिय हिला मोठ्या प्रमाणावर आर्थिक रक्कम देण्यात आली. हे प्रकरण लेक टाहो येथील एका सेलिब्रेटी गोल्फ स्पर्धेदरम्यान झालेल्या डोनाल्ड ट्र्म्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल यांच्यातील भेटीशी संबंधित आहे. (हेही वाचा, Donald Trump: माझ्यावरील आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित- डोनाल्ड ट्रम्प)

कोण आहे स्टॉर्मी डॅनियल?

स्टॉर्मि डॅनियल ही एक पॉर्न स्टार आहे. म्हणजेच ती एक अश्लिल चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री आहे. तिचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी क्लिफर्ड असे आहे. स्टॉर्मि डॅनियल हिने 'फूल डिस्क्लोज' नावाचे एक पुस्तक लिहीले आहे. या पूस्तकात तिने अनेक खळबळजनक दावे केले आहेत. जसे की डोनाल्ड ट्रम्प आणि तिच्यात लैंगिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र, स्टॉर्मी हिच्या पुस्तकातील दावा रिपब्लिकन नेता असलेल्या ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2023 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).