राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पतंप्रधान इम्रान खान शिखर परिषदेसाठी इस्लामाबाद - वॉशिंग्टन यांच्यात चर्चा

त्यामुळे पाकिस्तान तडफडत आहे. या पार्श्वभूमिवर ही भेट होऊ घातली जात आहे. त्यामुळे या भेटीबाबत उत्सुकता आहेच. पण, भारतही या भेटीवर नजर ठेऊन आहे.

Donald Trump-Imran Khan summit | (Archived and representative images)

महासत्ता अमेरिका आणि भारताचा शेजारी पाकिस्तान (Pakistan) या देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये शिखर परिषद पार पडावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन यांच्यात चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इम्रान खान (Imran Khan) यांच्यात शिखर बैठक पार पडेल. अफगानिस्तानमध्ये शांतता समझोता (Afghanistan peace deal) करण्यासाठी प्रामुख्याने उभय देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होईल. 2019 या नव्या वर्षात पाकिस्तानबाबत ट्रम्प यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांना म्हटले होते की, अमेरिका पाकिस्तानसोबत दृढ संबंध ठेऊ इच्छितो. तसेच, आपण नव्या नेतृत्वाला भेटण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. गेले काही दिवस अमेरिकेने पाकिस्तानला पुरवल्या जाणाऱ्या लष्करी मदतीचा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान तडफडत आहे. या पार्श्वभूमिवर ही भेट होऊ घातली जात आहे. त्यामुळे या भेटीबाबत उत्सुकता आहेच. पण, भारतही या भेटीवर नजर ठेऊन आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्य वृत्तानुसार, 'अद्याप शिखर परिषदेच्या प्रस्तावावरच चर्चा सुरु आहे. मात्र, अंतिम निर्णय अफगानिस्तानमधील शांतता समझोत्यावर सुरु असलेल्य सकारात्मक प्रयत्नांवरच केला जाईल.' ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ऑगस्ट 2018 मध्ये देशाचे पंतप्रधान बनलेले खान जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील. ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलतान बुधवारी म्हटले होते की, पाकिस्तानने अमेरिकेसोबत चांगले वर्तन केले नाही. (हेही वाचा,पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन-पाकिस्तान ट्रेड कॉरिडोरला स्थानिकांचा तीव्र विरोध )

ट्रम्प यांनी म्हटले होते की, आम्ही पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेऊ इच्छितो. पण, तो आमच्या विरोधकांना मदत करतो. तो विरोधकांचीच काळजी घेतो. आम्ही असे करु शकत नाही. त्यामुळे मी पाकिस्तनी नेतृत्वाला भेटू इच्छितो. आम्ही लवकरच भेटू. परंतू, आ्ही 1.3 अब्ज अमेरिकी डॉलरची मदत मात्र बंद करतो आहोत. जी आगोदर दिली जात होती.



संबंधित बातम्या