Diwali 2018 : UN कडून भारतीयांना खास दिवाळी गिफ्ट, दिव्यांची पोस्ट तिकीट सुरू

दिवाळी निमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टॅम्पची किंमत 14.95 USD म्हणजेच 1100 रूपयांपासून पुढे आहे.

दिव्यांची पोस्ट तिकीट सुरू Photo Credit : Twitter

भारतीय सण आणि संस्कृतीचा मूळ सार्‍यांनी एकत्र येऊन आनंद सेलिब्रेट करणं हाच असतो. मग दिवाळी हा सण त्याला अपवाद कसा ठरेल? दिवाळी केवळ भारतातच नव्हे तर जगात विविध ठिकाणी आणि विविध स्वरूपात दिवाळी साजरी केली जाते. यंदा भारतीयांच्या या दिवाळी सणाला संयुक्त राष्ट्र (UN) ने देखील थोडं स्पेशल केलं आहे. दिवाळी 2018 चं औचित्य साधत खास पोस्टल स्टॅम्प शीट प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्राअने शेअर केलेल्या स्टॅम्पमध्ये दिवे, रोषणाईच्या स्वरूपातील विविध स्टॅम्प्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दिवाळी निमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टॅम्पची किंमत 14.95 USD म्हणजेच 1100 रूपयांपासून पुढे आहे. संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईट हे स्टॅम्प उपलब्ध करण्यात आले आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवरही खास दिवाळीच्या शुभेच्छा असलेल्या लाईट्सने सजावट करण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर करण्यात आले आहेत.