Digital Condom: बाजारात आले डिजिटल कंडोम; जर्मन कंपनीने लॉन्च केले नवे ॲप, Sex दरम्यान ब्लॉक करेल कॅमेरा आणि माइक, जाणून घ्या सविस्तर

हे ॲप इंटेमसी म्हणजेच शारीरिक संबंधादरम्यान लोकांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केले आहे.

Digital Condom (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल कंडोमबद्दल (Condom) सर्वांनाच माहिती आहे. सुरक्षेसाठी त्यांचा वापर कसा होतो हेदेखील लोकांना चांगलेच माहीत आहे. पण तुम्ही 'डिजिटल कंडोम'बद्दल (Digital Condom) ऐकले आहे का? कदाचित नाही. आजकाल डिजिटल कंडोम हा सोशल मीडियावर एक लोकप्रिय चर्चेचा विषय बनला आहे. जर्मन लैंगिक स्वास्थ्य (Sexual Wellness) ब्रँड बिली बॉयने इनोसियन बर्लिनच्या सहकार्याने 'कॅमडॉम' नावाचे डिजिटल कंडोम ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप इंटेमसी म्हणजेच शारीरिक संबंधादरम्यान लोकांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केले आहे.

काय आहे डिजिटल कंडोम?

तर शारीरिक संबंध ठेवताना, गैर-सहमतीच्या कंटेंटचे रेकॉर्डिंग टाळण्यासाठी ब्लूटूथ वापरून हे ॲप मोबाइल डिव्हाइसचा कॅमेरा आणि माइक ब्लॉक करते.

कसे काम करते?

उत्पादकांनी सांगितले की, लोकांना हे ॲप त्यांच्या स्मार्टफोनमध्ये स्थापित करावे लागेल. त्यानंतर सेक्स करण्यापूर्वी यूजर्सना त्यांचे स्मार्टफोन एकमेकांच्या जवळ ठेवावे लागतील जेणेकरून ते ब्लूटूथद्वारे कनेक्ट होऊ शकतील. त्यानंतर ॲपमध्ये दिलेले एक बटण खाली स्वाइप करावे लागेल. असे केल्याने फोनचे सर्व कॅमेरा मायक्रोफोन ब्लॉक होतील. निर्मात्यांनी पुढे सांगितले की, जर कोणी कॅमेरा चालू करण्याचा प्रयत्न केला तर ॲप अलार्म वाजेल. हे ॲप एकाच वेळी अनेक उपकरणांचा कॅमेरा आणि मायक्रोफोन ब्लॉक करू शकते. (हेही वाचा: Contraceptive Ineffective In Mumbai: काहींचे कंडोम फाटले, कोणाकडे गर्भनिरोधक अकार्यक्षम ; मुंबई शहरात गर्भपाताची संख्या वाढली)

ॲपचे डेव्हलपर फेलिप आल्मेडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे, ‘आजकाल, स्मार्टफोन्स आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत आणि आपण त्यांच्यावर खूप संवेदनशील डेटा संग्रहित करतो, मात्र शारीरिक संबंधावेळी गैर-सहमतीपूर्ण सामग्री रेकॉर्ड करण्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी, आम्ही पहिले ॲप तयार केले आहे, जे ब्लूटूथ वापरून तुमचा कॅमेरा आणि माइक ब्लॉक करू शकते.’ बिली बॉयने सांगितले की, हे ॲप ३० हून अधिक देशांमध्ये वापरले जात आहे. हे अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि येत्या काही दिवसांत ते आयओएस उपकरणांमध्येही उपलब्ध होईल.