Miss Universe 2024 Winner: डेन्मार्कची Victoria Kjaer बनली 73 वी मिस युनिव्हर्स; क्राउन घालताना झाली भावूक, पहा व्हिडिओ
व्हिक्टोरिया 21 वर्षांची असून ती एक चांगली डान्सर आहे. तसेच ती पेशाने वकील आहे.
Miss Universe 2024 Winner: 73 व्या मिस युनिव्हर्सच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. होय, मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया केजर (Victoria Kjaer) ने मिस युनिव्हर्स (Miss Universe 2024) बनून जगात आपली वेगळी ओळख बनवली आहे. तिने प्रथम उपविजेती नायजेरियाच्या चिदिन्मा अदेत्शिना, द्वितीय उपविजेती मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान, तिसरी उपविजेती थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री आणि चौथी उपविजेती व्हेनेझुएलाची इलियाना मार्केझ यांना हरवून हा मुकुट जिंकला. भारताच्या रिया सिंघानेही या स्पर्धेत भाग घेतला आणि तिला टॉप 30 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यात यश आले. व्हिक्टोरियाला गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसने मुकूट घातला होता.
व्हिक्टोरिया केजर कोण आहे?
व्हिक्टोरिया केजरने तिच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने सिद्ध केले की, ती ब्यूटी विथ ब्रेन आहे. व्हिक्टोरिया 21 वर्षांची असून ती एक चांगली डान्सर आहे. तसेच ती पेशाने वकील आहे. शनिवारी तिने 126 देशांतील सौंदर्यवतींना हरवून हा मुकुट जिंकला. (हेही वाचा -Miss Universe 2024 Finale: भारताची रिया सिंघा मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत अपयशी)
मिस युनिव्हर्स 2024 विजेती व्हिक्टोरिया केजेर क्राउन घालताना झाली भावूक, पहा व्हिडिओ -
यंदाची मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा दरवर्षीपेक्षा वेगळी होती. 72 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले जेव्हा 28 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला. या यादीत, माल्टाची बीट्रिस न्जोया ही ग्रँड फायनलमध्ये पोहोचणारी 40 वर्षांवरील पहिली आणि एकमेव महिला ठरली.
रिया सिंघा अंतिम फेरीत अपयशी -
भारतातून मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेल्या सुंदरीचे नाव रिया सिंघा आहे. मेंदूसह सौंदर्याचे उत्तम उदाहरण घालून तिने देशाला गौरव मिळवून दिले. या स्पर्धेत रिया 30 व्या स्थानावर पोहोचली. मात्र, या स्पर्धेतच्या अंतिम फेरीत तिला यश मिळाले नाही. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.