Suprem Court ने दिलेल्या निर्णयावर Dassault Aviation ची उत्साही प्रतिक्रिया, मेक इन इंडियासाठी समर्पित
या निर्णयावर खूश होत दसॉल्ट (Dassault Aviation) कंपनीने आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
राफेल करारामध्ये (Rafel Deal) कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने (Suprem Court) दिला. या निर्णयावर खूश होत दसॉल्ट (Dassault Aviation) कंपनीने आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) चालू केलेल्या मेक इन इंडियाच्या (Make In India) प्रकल्पात आम्ही समर्पित आहोत असे सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. तर या निर्णयावर रंजन गोगई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राफेल कराराबद्दल न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मात्र सरकार खरेदी करत असलेली 126 विमानच्या प्रकरणात हस्तक्षेप करु शकत नाही.
काँग्रेसच्या नेत्यांकडून राफेल कराराबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली होती. तसेच अनिल अंबानी यांच्या खिशात 30 हजार कोटी घालतले असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.