Pulitzer Prize 2020: डार यासीन, मुख्तार खान, चन्नी आनंद पुलित्जर पुरस्कार 2020 ने सन्मानित

या तिघांनाही या परिसरात अत्यंत आव्हानात्मक स्थितीत फोटोग्राफी करावी लागली.

Pulitzer Prize Announcement Postponed. (Photo Credits: Twitter)

कोरना व्हायरस जगभरात आव्हान असण्याच्या या काळात यंदाचे पुलित्जर पुरस्कार जाहीर झाले आहेत. सोमवारी रात्री उशीरा या पुरस्कारांची घोषणा झाली. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार एसोसिएटेड प्रेस (Associated Press) फोटोग्राफर डार यासीन (Dar Yasin), मुख्तार खान (Mukhtar Khan) आणि चन्नी आनंद (Channi Anand) यांना काश्मीरच्या फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize 2020) देण्यात आला. जम्मू कश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जम्मू कश्मरमध्ये (Lockdown) करण्यात आले होते. तसेच कर्फ्यूही लावण्यात आला होता. सर्व संपर्क यंत्रणाक खंडीत करण्यात आल्या होत्या. या काळात या तिघांनी फोटोग्राफी केली होती. जी प्रचंड गाजली.

ज्या काळात या तिनही छायाचित्रकारांनी फोटोग्राफी केली तो काळ अत्यंत कठीण आणि खडतर होता. या तिघांनीही आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी केली. केद्र सरकारने या काळात जम्मू कश्मीरमधील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना अटक केले होते. तीन माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह हजारो लोकांना अटक करण्यात आली होती. पुढे फारुख अब्दुल्ला आणि ओमर यांना तब्बल सात महिन्यांच्या कोठडीनंतर सोडण्यात आले, अशी ती परिस्थिती होती. (हेही वाचा, Ramon Magsaysay Award 2019: पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार; पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव)

ट्विट

इंटरनेट ब्लॅकआउट आणि इतर संचार वाहिन्यांवरील निलंबनादरम्यान या भारतीय छायाचित्रकारांना काश्मीरमध्ये काय घडत आहे हे जगाला दाखवणे आवश्यक वाटले. या तिघांनाही या परिसरात अत्यंत आव्हानात्मक स्थितीत फोटोग्राफी करावी लागली. इतकी की नियमांचे पालन करुन सुरु असलेल्या बाजार, गर्दी अथवा कर्फ्यूच्या ठिकाणी कॅमेरा लपवून न्यावा लागत असे. जीवावर उदार होऊन या तिन्ही फोटोग्राफर्सनी जम्मू कश्मीरमध्ये काय चालले आहे. परिस्थिती कशी आहे या सर्व गोष्टींचे अपडेट फोटोंच्या माध्यमांतून त्यांनी दिल्ली कार्यालयांपर्यंत पोहोचवले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif