Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी व्याप्ती वाढवते आहे, नायजेरिया आणि घाना देशानेही स्वीकारली Digital Currency

नायजेरीया ही अफ्रिकी देशातील सर्वात मोठी अर्थव्यस्था म्हणून ओळखली जाते.नायजेरीया देशाने आपली मूळ करन्सी नैरा (Naira) चे डिजिटल व्हर्जन ई-नैरा (e-Naira) लॉन्च केले सुद्धा. 1 ऑक्टोबर पासून ई नायरा चलनात आले.

Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतासह जगभरातील अनेक देश क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) स्वीकारण्याबाबत अद्याप सहमत नाहीत. असे असले तरी क्रिप्टोकरन्सी स्वीकारणाऱ्या देशांची संख्याही हळूहळू वाढत आहे. नायजेरिया आणि घाना या दोन देशांनी क्रिप्टोकरन्सी अधिकृतपणे स्वीकारण्याचा निर्णय नुकातच घेतला. लवकरच नायजेरिया (Nigeria) आणि घाना (Ghana) या दोन्ही देशांची सरकारे आपली स्वत:ची डिजिटल करन्सी (Digital Currency) आणत आहेत. नायजेरीया ही अफ्रिकी देशातील सर्वात मोठी अर्थव्यस्था म्हणून ओळखली जाते.नायजेरीया देशाने आपली मूळ करन्सी नैरा (Naira) चे डिजिटल व्हर्जन ई-नैरा (e-Naira) लॉन्च केले सुद्धा. 1 ऑक्टोबर पासून ई नायरा चलनात आले. घानानेही आपल्या चलनाचे डिजिटल वर्जन e-Cedi ट्रायल बेसीसवर सुरु केले आहे.

नायजेरियातील क्रिप्टोकरन्सी टांजेक्शनवर बंदी होती. मात्र, तरीही लोक क्रिप्टो करन्सीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत होते. त्यामुळे नायजेरियात क्रिप्टोकरन्सीची मागणी आणि लोकप्रियता मोठी होती. इतर चलनांच्या तुलनेत नायजेरियाचे चलन नायराचे घटत असलेले मूल्य. वाढती बेकारी, बेरोजगारी, जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा आदी खर्च उचलण्यासाठी लोक क्रिप्टोकरन्सीचा आधार घेत असल्याचे पुढे आले होते. (हेही वाचा, China Bans Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना चीनमध्ये बंदी, Bitcoin, Dogecoin मार्केट कोसळले)

डिजिटल पेंमेंट, क्रिप्टोकरन्सी आणि खासगी पातळीवर जारी करण्यात येत असलेले स्टेबलकॉइन्सची वाढ पाहता जगातील अनेक देश आपल्या केंद्रीय बंँकेद्वारा व्हर्च्युअल पैसा लीगल टेंडरमध्ये परावर्तीत करण्याबाबत पर्याय शोधत आहेत. केंद्रीय बँकेच्या समर्थनार्थ जारी करण्यात आलेली डिजिटल करन्सी (CBDCs) आणि क्रिप्टोकरन्सी दोन्हीतही व्हर्च्युअल मनी आहे. दरम्यान, यात फरक इतकाच की CBDCs ला मध्यवर्थी बँक जारी करते आणि त्यावर त्या बँकेचे नियंत्रण असते. व्हर्च्युअल करन्सी या नियंत्रणाच्या बाहेर असते.