Crocodile Feast: श्वानांना भक्ष बनवणाऱ्या मगरीची आदीवासींकडून फिस्ट; 11 फूट लांबीच्या मगरीचे मटण करून खाल्ले
बेनेस नदीत मगरीचे वास्तव्य होते. तिने आत्तापर्यंत गावात दहशत पसरवूण अनेक श्वानांना आपले भक्ष बनवले होते
Crocodile Feast: उत्तर ऑस्ट्रेलियातील गावात दहशत पसरवणाऱ्या एका मगरीला स्थानिकांनी खाल्ल्याचे समोर आले आहे. उत्तर ऑस्ट्रेलियातील बेनेस नदीत मगरीचे वास्तव्य होते. तिने आत्तापर्यंत गावात दहशत पसरवूण अनेक श्वानांना आपले भक्ष बनवले होते. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे मगर बेनेस नदीत आली होती. अनेक वेळा तिचा वावर गावात होत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे लहान मुलांना आणि महिलांना धोका निर्माण झाला होता. गावातील वाढती असुरक्षितता पाहता. नागरिकांनी वन्य सुरक्षा दलाला याची माहिती दिली होती. (हेही वाचा:Rajasthan: राजस्थानमध्ये वेगवान कारची उंटाला धडक; काच फोडून उंट थेट कारमध्ये... (Watch VIdeo) )
काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मगर दिसून आल्याने गावातील सर्व प्रौढांच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या एकमताने पोलिसांनी मगर पकडल्यानंतर तिला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर आदिवासी समाजातील नागरिकांनी गावची परंपरा म्हणून तिचे तुकडेकरून फिस्ट करत तिला खाल्ले. यावेळी संपूर्ण गावाने तिचे मटण खाल्ले.
उत्तर ऑस्ट्रेलियातील खाऱ्या पाण्यातील समुद्रातदेखील मगरी सहा मीटर (२० फूट) पर्यंत आढळून आल्या आहेत. त्यांचे वजन एक टनपर्यंत असण्याचा अंदाज स्थानिक वर्तवत आहेत. त्या काहीही खाऊ शकतात याची भिती नागरिकांनी व्यक्त केली.