Crocodile Kills Boy: मगरीने 8 वर्षांच्या मुलाला त्याच्या पालकासमोरच खाल्ले, Costa Rica येथील घटना
कोस्टा रिका (Costa Rica) येथे अत्यंत धक्कादायक तितकीच भयावह घटना घडली आहे. लिमोन (Limón) मधील घराजवळील मॅटिना नदी (Matina River) किनारी खेळत असताना एका 8 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला (Crocodile Attack) केला. धक्कादय म्हणजे या वेळी या मुलाचे पालकही तिथे हजर होते.
कोस्टा रिका (Costa Rica) येथे अत्यंत धक्कादायक तितकीच भयावह घटना घडली आहे. लिमोन (Limón) मधील घराजवळील मॅटिना नदी (Matina River) किनारी खेळत असताना एका 8 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला (Crocodile Attack) केला. धक्कादय म्हणजे या वेळी या मुलाचे पालकही तिथे हजर होते. पालकांसमोरच मगरीने या मुलाला मारुन (Crocodile Kills Boy) खाऊन टाकले. यात मुलाचा मृत्यू झाला. अत्यंत भयावह घटनेची सध्या इंटरनेटवर जगभरात चर्चा सुरु आहे.
न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ज्युलिओ ओटेरो फर्नांडीझ (Julio Otero Fernandez )असे पीडितेचे नाव असून, हल्ल्यादरम्यान मगरीने त्याच्या शरीराची चिरफाड केली. ज्युलिओ ओटेरो फर्नांडीझ गुडघाभर पाण्यात उभा होता तेव्हा मोठ्या मगरीने त्याच्यावर झडप घातली. मगरीने त्याच्यावर हल्ला केला. लहान मुलच ते. भीतीने त्याच्या शरीराचा लोळागोळा झाला. मगरीने त्याला जबड्यात पकडले आणि खेचत पण्याकडे नेले. ती मगर त्या मुलाला घेऊन मॅटिना नदीच्या पाण्यात खोलवर गेली. ही घटना 30 ऑक्टोबरच्या दुपारी 2 च्या सुमारास घडली. ही भीषण घटना घडली तेव्हा तो त्याच्या चार भावंडांसह, पालकांसह आणि इतर नातेवाईकांसोबत काही वेळ घालवत होता. (हेही वाचा, Crocodile Attack Man Viral Video: मगर पकडायला गेला, मगरमिठीत अडकला; थोडक्यात वाचला बापुडा (पाहा व्हिडिओ))
ज्युलिओ ओटेरो फर्नांडीझ (मगरीच्या हल्ल्यातील मृत) याच्या वडिलांनी सांगितले की, माझ्यासाठी ही अत्यंत दु:खाची आणि खेदाची बाब अशी की, आमच्या डोळ्यासमोर मुलाला मगर घेऊन जात असताना आम्ही काहीच करु शकलो नाही. माझ्या बाळाचे शरीर पाण्यात तरंगताना पाहणे ही माझ्या पत्नीसाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे. दरम्यान, नदीकिनारी असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पालकांनी केला. यावर एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, मगरीने हल्ला केला तेव्हा माझ्याकडे बंदूक होती. परंतू, मी असहाय होतो. प्राण्याला गोळी घालण्याचा मला अधिकार नव्हता. त्यामुळे मी ते कृत्य करु शकलो नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)