COVID-19 Vaccine Update: रशिया मध्ये कोरोना व्हायरस वरील 'Sputnik V' लसीच्या पहिल्या बॅचचे उत्पादन

कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये जगातील सर्वात पहिली लस Sputnik V च्या पहिल्या बॅचचे उत्पादन करण्यात आले आहे, अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

कोविड-19 (Covid-19) विरुद्धच्या लढाईमध्ये जगातील सर्वात पहिली लस Sputnik V च्या पहिल्या बॅचचे उत्पादन करण्यात आले आहे, अशी माहिती रशियाच्या (Russia) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. रशियातील Sputnik News ने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या आरोग्य मंत्रालयाने Sputnik V च्या पहिल्या बॅचच्या उत्पादनाची शनिवारी पत्रकार परिषदेत घोषणा केली. दरम्यान या लसीची वैद्यकीय चाचणी युएई (United Arab Emirates), सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि फिलिपिन्स (Philippines) मध्ये सुरु आहे.

कोविड-19 विरुद्धची ही लस  Gamaleya Scientific Research Institute of Epidemiology and Microbiology यांनी विकसित केली असून या लसीचे पहिल्या बॅचचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. Gamaleya National Research Center चे डिरेक्टर Alexander Gintsburg यांनी असे सांगितले की, या वर्षाअखेरपर्यंत या लसीचे 50 लाख डोसेस उपलब्ध करुन देण्याची रशियाची योजना आहे.

कोरोना व्हायरस वरील Sputnik V या लसीचे 2 वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत. पहिले इंजेक्शन घेतल्यानंतर 3 आठवड्यांनी दुसरे इंजेक्शन घ्यावे लागते. ही दोन्ही इंजेक्शन्स घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी वाढते. (रशियाच्या कोविड 19 लसीच्या मानवी चाचणीत सहभागी स्वयंसेवकाचा फोटो राष्ट्रपती पुतिनच्या लेकीचा? जाणून घ्या सत्य)

रशियाने कोरोना व्हायरस वरील जगातील पहिली लस विकसित केली असून Sputnik V असे या लसीचे नाव आहे, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांनी मंगळवारी केली होती. या लसीचे उत्पादन आम्ही 2 आठवड्यात सुरु करु अशी माहिती रशियाचे आरोग्यमंत्री Mikhail Murashko यांनी दिली आहे. या लसीच्या सकारात्मक परिणामाबद्दल आम्हाला कोणतेही शंका नाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, रशियामध्ये एकूण 917,884 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 15,617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 729,411 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif