COVID-19 Pandemic: युरोपमध्ये कोरोना व्हायरस महामारी अंताच्या दिशेने: WHO
डब्ल्यूएचओचे निदेशक हंस क्लूज (Hans Kluge) यांनी म्हटले आहे की, कोविड-19 चा ओमायक्रोन व्हेरीएंट (Omicron Variant) यूरोपीय देशांमध्ये एका नव्या टप्प्यात स्थलांतर करत आहे.
कोरोना व्हायरस महामारीने (COVID-19 Pandemic) जगासमोर चिंता व्यक्त केली असली तही जागतिक आरोग्य संघटना अर्थातच डब्ल्यूएचओ (WHO) ने जगभरातील नागरिकांना एक दिलासा दिला आहे. डब्ल्यूएचओचे निदेशक हंस क्लूज (Hans Kluge) यांनी म्हटले आहे की, कोविड-19 चा ओमायक्रोन व्हेरीएंट (Omicron Variant) यूरोपीय देशांमध्ये एका नव्या टप्प्यात स्थलांतर करत आहे. या टप्प्यात त्याचा अंत होऊ शकतो. खरोखरच हे समाधनाकराक आणि कौतुकास्पद आहे की, ओमायक्रोन संसर्ग हा स्वत:हूनच आपल्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या एका मुलाखतीत हंस क्लूज यांनी म्हटले आहे की , आमायक्रोन मार्चपर्यंत 60% युरोपीय लोकांमध्ये संक्रमण करु शकतो. जर एकदाच ओमायक्रोनचा उच्चांक संपूर्ण युरोपमध्ये कमी झाला तर काही आठवड्यांमध्येच आणि काही महिन्यांमध्ये कोरोनाविरोधात जगभरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. असे घडणे एक तर लसीकरणामुळे होऊ शकते किंवा नागरिकांमध्ये संसर्गाविरोधात नैसर्गिक रुपातच प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने होऊ शकते. (हेही वाचा, )
क्लूज यांनी पुढे बोलताना म्हटले की, आमचा अंदाज आहे की, कोविड-19 संपताच पहिल्याच वर्षी तो पुन्हा परतू शकतो. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, महामारी पुन्हा एकदा येऊ शकेल. अमेरिकेतील एका मुख्य वैज्ञानिक अंथनी फौसी यांनीही रविवारी अशाच प्रकारची एक शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी एबीसी न्यूज टॉक शो 'द वीक' मध्ये म्हटले आहे की, संयुक्त राज्य अमेरिकेच्या काही भागांमध्ये कोविड-19 संसर्ग अत्यंत कमी झाल्याचे आढळून येत आहे. हे चांगले संकेत आहेत.