Coronavirus: ढासळलेली अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी डोनाल्ड ट्रंप घेणार भारतीय दिग्गजांकडून सल्ले; स्थापन केली समिती, सुंदर पिचाई, सत्या नडेला यांचा समावेश

अमेरिके (US) सारखा विकसित देशही यातून सुटला नाही. चीनसोबत अमेरिका, इटली, स्पेन हे काही देश या विषाणूमुळे पूर्णतः प्रभावित झाले आहेत.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo Credit-IANS)

चीनच्या (China) वूहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) या आजाराने अनेक देशांना ग्रासले आहे. अमेरिके (US) सारखा विकसित देशही यातून सुटला नाही. चीनसोबत अमेरिका, इटली, स्पेन हे काही देश या विषाणूमुळे पूर्णतः प्रभावित झाले आहेत. या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली असून ती कशी सुधारायची हा मोठा प्रश्न सतावत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांनी कोरोना व्हायरसमुळे ग्रस्त असलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देण्यासाठी, 'ग्रेट अमेरिकन इकॉनॉमिक रिव्हाइवल इंडस्ट्री ग्रुप्स'ची (Great American Economic Revival Industry Groups) स्थापना केली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी तयार केलेल्या गटामध्ये गूगलच्या सुंदर पिचाई (Sunder Pichai) आणि मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला (Satya Nadella) यांच्यासह सहा भारतीय-अमेरिकन लोकांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी सुमारे अडीच डझन वेगवेगळे गट तयार केले आहेत, ज्यात विविध उद्योग आणि वर्गातील 200 हून अधिक अमेरिकन दिग्गज आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी हे गट देशाला मार्गदर्शन करतील. कोरोना विषाणू साथीच्या विषयाबद्दल भाष्य करताना ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत, या संघटीत केलेय गटाबद्दल आणि त्यामध्ये सामील असलेल्या लोकांबद्दल आशा व अपेक्षा व्यक्त केली. हे लोक अतिशय हुशार आहेत ते आम्हाला काही नवीन बदल सुचवतील, असे ते म्हणाले. (हेही वाचा: मेरा भारत महान: कोरोना व्हायरसच्या लढाईबाबत भारताचे केले कौतुक; अमेरिकेमधील तेलुगु NRI विरोधात न्यू जर्सी येथे गुन्हा दाखल)

दरम्यान, तांत्रिक गटात पिचाई आणि नडेला शिवाय आयबीएमचे अरविंद कृष्ण आणि मायक्रोनचे संजय मेहरोत्रा ​​समाविष्ट आहेत. त्याव्यतिरिक्त पेरिनोड रिकार्ड भारतीय-अमेरिकन एन. मुखर्जी यांना उत्पादन गटात स्थान दिले गेले आहे. मास्टरकार्ड अजय बंगा यांचा आर्थिक सेवांच्या समूहात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 26 हजारांवर पोहोचली आहे. त्याच वेळी अमेरिकेत संक्रमित लोकांची संख्या 6,13,886 वर पोहोचली आहे.