Coronavirus: कोरोना व्हायरस संक्रमितांचा जगभरातील आकडा 66 लाखांच्या पार, आतापर्यंत 3.99 लाख मृत्यू
इंग्लंडमध्ये 39 हजार 987 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. युरोपीय देशांमधील हा सर्वात मोठा आकडा आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची जगभरातील वाढती संख्या आजही कामय आहे. जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येने आता 66 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृत्यूची संख्याही 3 लाख 89 हजारांहून अधिक झाली आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंन्स यूनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग (CSSE) द्वारा प्राप्त ताज्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळपर्यंत जगभरात 66 लाख 01 हजार 349 कोटी नागरिकांना कोविड 19 विषाणूचे संक्रमन झाले आहे. तर आतापर्यंत 3 लाख 89 हजार 645 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सीएसएसईने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संक्रमितांची आणि त्यामुले मृत्यू झालेल्यांचीही सर्वाधिक संख्या ही अमेरिकेत आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही जगभरात सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 18 लाख 72 हजार 557 इतकी आहे. तर कोरना संक्रमितांचा मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 8 हजार 208 इतकी आहे. दरम्यान, अमेरिकेपाठोपाठ आजघडीला 5 लाख 84 हजार 16 कोरोना रुग्णांसह ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर तर रशिया (4 लाख 40 हजार 538) तिसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा, New Ebola Outbreak: कोरोना व्हायरस नंतर आता इबोला ने 'या' देशात घेतले चार बळी; WHO तर्फे करण्यात आली पुष्टी)
विविध ना देशांची संख्या
- अमेरिका- 18 लाख 72 हजार 557
- ब्राजील- 5 लाख 84 हजार 16
- इंग्लंड- 2 लाख 83 हजार 79
- स्पेन- 2 लाख 40 हजार 660
- इटली- 2 लाख 34 हजार 13
- भारत- 2 लाख 26 हजार 713
- फ्रान्स- 1 लाख 89 हजार 569
- जर्मनी- 1 लाख 84 हजार 472
- पेरु- 1 लाख 83 हजार 198
- तुर्की- 1 लाख 67 हजार 410
- इरान- 1 लाख 64 हजार 270
- चिली- 1 लाख 18 हजार 292
- मेक्सिको- 1 लाख 5 हजार 680
सीएसएसईच्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या मृत्यूसंख्येच्या जागतिक आकडेवारीनुसार अमेरिकेनंतर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडमध्ये 39 हजार 987 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. युरोपीय देशांमधील हा सर्वात मोठा आकडा आहे. दरम्यान, 10 हजारांहून अधिक कोरोना व्हायरस संक्रमितांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये इटली (33 हजार 689, ब्राजिल (32 हजार 548), फ्रान्स (29 हजार 68), स्पेन (27 हजार 133) आणि मेक्सिको (12 हजार 545) या देशांचा समावेश आहे.