IPL Auction 2025 Live

Coronavirus: पाकिस्तान येथे कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजाराच्या पार, परिस्थिती आणखी गंभीर होण्यची शक्यता- पंतप्रधान इम्रान खान

मात्र अद्याप 31 जणांची प्रकृती अधिक नाजूक आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना देशावरील संकटाची चिंता सतावत असून परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Imran Khan (Photo- PTI)

पाकिस्तान (Pakistan) येथे गुरुवारी कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण झाल्याचे नवे 248 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे पाकिस्तानात आता एकून कोरोनाबाधितांचा आकडा 4322 वर पोहचला आहे. पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांच्या लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर ही येथील परिस्थिती नियंत्रणात येत नाही आहे. उलट कोरोना व्हायरसचा वेगाने प्रादुर्भाव होत असून बऱ्याच गोष्टींसाठी अडथळे येत आहेत. राष्ट्रीय आरोग्यसेवा मंत्रालयानुसार, पाकिस्तानात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर आतापर्यंत 63 लोकांचा बळी गेला आहे. त्यापैकी 5 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला 572 जणांनी उपचार घेऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र अद्याप 31 जणांची प्रकृती अधिक नाजूक आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना देशावरील संकटाची चिंता सतावत असून परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पंजाबमध्ये 2171, सिंध येथे 1036 आणि खैबर पख्तुनख्वा येथे 560, गिलगित बाल्टिस्तान येथे 213, बलूचिस्तान येथे 212, इस्लामबाद येथे 102 आणि पाकव्याप्त कश्मीर येथे 28 नवी प्रकरणे समोर आली आहेत. इमरान खान यांनी बुधवारी देशाची चिंता व्यक्त करत परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्याचसोबत वाढती कोरोनाबाधितांची संख्येमुळे त्याच्या विरोधात लढण्यासाठी पुरेश्या प्रमाणात रुग्णालये उपलब्ध नसल्याचे ही इमरान खान यांनी म्हटले आहे.(Coronavirus: अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 बाधित तब्बल 2,000 नागरिकांचा मृत्यू) 

पाकिस्तान येथे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेले नाही. तसेच 25 टक्क्यांहून अधिक नागरिक येथील द्रारिद्र रेषेखाली असल्याने पूर्णपणे लॉकडाउन करणे अशक्य आहे. इमरान खान यांनी एका योजनेची सुरुवात केली असून त्याअंतर्गत 14 कोटी 40 लाख रुपयांची मदत कोरोना व्हायरसच्या संक्रमित परिवाराला देण्यात येणार आहेत. तसेच गरिबांसाठी सुद्धा पैशांचे वाटप केले जाणार आहे.