Coronavirus: जगभरात 20.26 कोटींपेक्षाही अधिक कोरोना संक्रमित, 42.9 लाख नागरिकांचा मृत्यू, 4.33 जणांचे लसीकरण

आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जगभरात 20.26 कोटी पेक्षाही अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस (COVID-19) संसर्ग झाला आहे. आतापर्यंत सुमारे 42.9 लाखांपेक्षाही अधिक नागरिकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जगभरात 20.26 कोटी पेक्षाही अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस (COVID-19) संसर्ग झाला आहे. आतापर्यंत सुमारे 42.9 लाखांपेक्षाही अधिक नागरिकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4.33 अब्ज लोकांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले आहे. ही आकडेवारी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने जाहीर केली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने सोमवारी सकाळी जगभरातील प्राप्त आकडेवारीची माहिती दिली. या आकडेवारीनुसार सध्यास्थितीत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित, कोरोना संक्रमनाने मृत्यू झालेले आणि कोरोना लसीकरण झालेलेल्यांची आकडेवारी अनुक्रमे 202,661,707, 4,293,555 आणि 4,339,912,422 इतकी झाली आहे.

सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेत अधिक आहे. ही संख्या अनुक्रमे 35,762,751 आणि 616,827 इतकी आहे. कोरोना व्हायरस संक्रमितांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत 31,934,455 कोरोना रुग्ण आढळले आहेत. (हेही वाचा, कोविड-19 चा Delta पेक्षाही घातक Variant येण्याची शक्यता; तज्ञांचा सावधगिरीचा इशारा)

सीएसआयच्या आकडेवारीनुसार 30 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्यांमध्ये अमेरिका, भारत या देशानंतर ब्राजील (20,165,672), फ्रान्स (6,371,349), रशिया (6,362,641), यूके (6,098,085), तुर्की (5,895,841), अर्जेंटीना (5,018,895), कोलंबिया (4,838,984), स्पेन (4,588,132), इटली (4,396,417), ईरान (4,158,729), जर्मनी (3,797,849) आणि इंडोनेशिया (3,666,031) आदी देशांचा समावेश आहे.

कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राजीलमध्ये 563,151 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ज्या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 100,000 पेक्षा अधिक आहे अशा देशामध्ये भारत (427,862), मैक्सिको (244,420), पेरू (196,873), रशिया (162,109), यूके (130,624), इटली (128,220), कोलंबिया (122,458), फ्रान्स (112,407), अर्जेंटीना (107,459) आणि इंडोनेशिया (107,096) आदी देशांचा समावेश आहे.